The Archies Trailer esakal
मनोरंजन

The Archies Trailer : आर्यन नाही पण 'सुहाना' चमकली! शाहरुखच्या लेकीचा 'द आर्चीज' चा ट्रेलर पाहिलाय? अभिनयाचं होतंय कौतुक

सोशल मीडियावर सुहानाचा चाहतावर्ग मोठा आहे. तिला इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

युगंधर ताजणे

The Archies Web Serise Trailer Shah Rukh Khan Daughter Suhana : बॉलीवूडचा किंग खान शाहरुख हा नेहमीच त्याच्या चित्रपट आणि स्टाईलसाठी चर्चेत असतो. आता मात्र त्याची लाडकी लेक सुहाना खान ही लाईमलाईटमध्ये आली आहे. त्याला कारणही तसेच आहे. सुहाना प्रसिद्ध दिग्दर्शक झोया अख्तर यांच्या द आर्चीज मध्ये झळकली आहे. त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. The Archies Web Series Trailer Shah Rukh Khan Daughter Suhana

सोशल मीडियावर सुहानाचा चाहतावर्ग मोठा आहे. तिला इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. द आर्चीजचा ट्रेलर समोर आल्यानंतर तिच्या चाहत्यांनी तिचं मोठ्या प्रमाणात कौतुक केलं आहे. द आर्चीजमधून सुहाना फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करत असल्याचे बोललं जात आहे. अशावेळी तिच्या या नव्या चित्रपटाची चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची चर्चा होती.

आर्चीजमधून सुहाना खान, खुशी कपूर, अगस्त्य नंदा यांनी डेब्यू केलं आहे. मात्र चर्चा सुहानाची होत आहे. यापूर्वी शाहरुखच्या आर्यन खानच्या डेब्यूविषयी बोललं जात होतं. मात्र सुहानानं आघाडी घेतली आहे. तिच्या नव्या चित्रपटाविषयी किंग खाननं यापूर्वी एका मुलाखतीमधून खुलासा केला होता. त्यानंतर नेटकऱ्यांना, चाहत्यांना द आर्जीजची कमालीची उत्सुकता होती.

ट्रेलर पाहिल्यानंतर हा चित्रपट एका हॉलीवूडच्या चित्रपटावर आधारित असल्याचे दिसून येते. त्यातील पात्रं, त्यांचे बोलणे, राहणीमान आणि कथा हे सारं वेगळ्याच झोनमधील असल्याच्या प्रतिक्रियाही समोर आल्या आहेत. अशावेळी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा प्रेक्षकवर्ग नेमका कोणता असेही प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केले आहेत. यापूर्वी द आर्चीजच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.

कॉमिक बूक आर्चिजची प्रेरणा घेत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. ६० च्या दशकांतील कथा चित्रपटातून सादर करण्यात आली आहे. शाळकरी विद्यार्थ्यांचा एक ग्रुप ज्यांची मैत्री, त्यांच्यातील वाद,भांडणं आणि त्यांनी केलेली कामगिरी अन् त्यांची वाटचाल या गोष्टींवर आर्चिजच्या माध्यमातून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

सुहाना, खुशी यांचा हा चित्रपट ७ डिसेंबर रोजी नेटफ्लिक्स या ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन झोया अख्तर यांनी केले असून त्याची निर्मिती बोनी कपूर यांनी केली आहे. बोनी कपूर यांची मुलगी खूशी कपूर ही देखील आर्चिजच्या निमित्तानं बॉलीवूमध्ये डेब्यू करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT