Asur 2, Asur 2 release date, Asur 2 starcast, Asur 2 full webseries, Asur 2 ott SAKAL
मनोरंजन

Asur 2 First Look: बहुचर्चित 'असुर २' अखेर प्रेक्षकांच्या भेटीला, 'या' तारखेपासून पहा अगदी मोफत

अर्शद वारसी आणि बरुण सोबती यांच्या 'असुर सीझन 2' या वेब सीरिजचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे.

Devendra Jadhav

Asur 2 Trailer News: गेल्या अनेक महिन्यांपासून गाजलेल्या असुर सिनेमाच्या दुसऱ्या सिझनची खूप चर्चा आहे. दुसरा सिझन कधी येणार? असा प्रश्न अनेकांना विचारण्यात येत आहे. अखेर या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे.

अर्शद वारसी आणि बरुण सोबती यांच्या 'असुर सीझन 2' या वेब सीरिजचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. हा फर्स्ट लूक पाहता, पहिला सिझन जिथे संपला होता तिथूनच त्याची कथा सुरू झाल्याचे दिसते.

(The first promo of Arshad Warsi amey wagh riddhi dogra and Barun Sobti's Asur 2 is out)

असुर २ या वेब सिरीजमध्ये असुरांच्या उत्पत्तीपासून ते त्यांच्या अस्तित्वापर्यंतची कथा मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही कथा विज्ञान आणि धर्म यांच्यातील नाते सांगते.

असुर २ चा काही मिनिटांचा हा ट्रेलर आणि फर्स्ट लूक पाहता असे म्हणता येईल की, पहिल्या सीझनप्रमाणेच 'असुर 2' देखील धमाकेदार असणार आहे.

असुर २ च्या टिझरमध्ये अर्शद वारसी राक्षसाला पकडण्यासाठी निघालेला दिसत आहे. हाच असुर सिरीयल किलर बनून लोकांना मारतोय.

या वेब सिरीजच्या दुसऱ्या भागातही तुम्हाला फॉरेन्सिक तज्ज्ञ निखिल म्हणजेच बरुण सोबती आणि सीबीआय अधिकारी धनंजय राजपूत (अर्शद वारसी) यांच्यातील मतभेद आणि असुर यांच्यातील संबंध पाहायला मिळतील.

याशिवाय या सिनेमात मुख्य खलनायकाच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता अमेय वाघ झळकणार आहे.

असुर मधील प्रमुख अभिनेत्री रिद्धी डोगराने इंस्टाग्रामच्या ऑफिशियल अकाऊंटवर 'असुर 2' चा फर्स्ट लूक शेअर केला आहे.

तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते- 'तुमची प्रतीक्षा आता संपली आहे. तुमच्यासाठी मोस्ट अवेटेड 'असुर सीझन 2' चा फर्स्ट लुक सादर करत आहे. लवकरच भेटू, फक्त जिओ सिनेमावर. तेही मोफत. 1 जून रोजी.'

ओनी सेनने असुर वेब सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. या वेब सीरिजचा पहिला सीझन 2 मार्च 2022 रोजी रिलीज झाला होता. आता १ जूनला असुरचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू, BMC चा निष्काळजीपणा जीवावर बेतला... माणूस पडतानाचा Video समोर... बचावकार्य अपयशी

Mumbai Pune Red Alert : राज्यात मान्सूनची दमदार वाटचाल ! पुढील ४ दिवस पावसाचे; मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांत रेड अलर्ट

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेवर 'लँड जिहाद विरोध' जनआक्रोश मोर्चा

Mumbai Manhole Accident : मुंबईत २० ते २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये माणूस पडला; बचावकार्य सुरू... BMC चा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

अटल टनेलजवळ भीषण अपघात, बोगद्यातून बाहेर येताच स्कॉर्पिओ थेट नदीत बांधकाम सुरू असलेल्या पिलरवर लटकली, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT