captain america news  esakal
मनोरंजन

Video: साध्याभोळ्या धनुषला पाहून कॅप्टन अमेरिकाची भारी रिअ‍ॅक्शन

रजनीकांतचा जावई म्हणून धनुषला सारं जग ओळखायचं. पण झालं असं की, काही महिन्यांपूर्वी रजनीकांतची मुलगी ऐश्वर्या आणि धनुषचा काडीमोड झाला.

युगंधर ताजणे

The Grey Man Movie: रजनीकांतचा जावई म्हणून धनुषला सारं जग ओळखायचं. पण झालं असं की, काही महिन्यांपूर्वी रजनीकांतची मुलगी ऐश्वर्या आणि धनुषचा काडीमोड झाला. असंख्य चाहत्यांना कमालीचं वाईट वाटलं. ज्या अभिनेत्यावर आपण एवढं प्रेम करतो, ज्याचे चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करतो त्या (tollywood News) धनुषनं असं करणं त्याच्या चाहत्यांना आवडलं नाही. वास्तविक काही वर्षांपासून ऐश्वर्या आणि धनुषमध्ये काही आलबेल नव्हतं. त्यांचं (Dhanush movie news) बिनसलं हे सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि वेगळ्याच चर्चेला तोंड फुटलं. सध्या धनुष वेगवेगळ्या कारणांसाठी पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

कॅप्टन अमेरिकामध्ये प्रमुख भूमिका साकारलेल्या ख्रिस इव्हान्सनं धनुषला (Entertainment News) पाहून जी रिअॅक्शन दिली आहे ती चर्चेत आली आहे. त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. त्याचे कारण प्रसिद्ध अभिनेता धनुष हा द ग्रे मॅनमधून हॉलीवूडमध्ये दिसणार आहे. त्यामुळे त्याला नेटकऱ्यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत. गेल्या वर्षी धनुषला असुरनमधील भूमिकेसाठी राष्ट्रपतीपदकानं गौरविण्यात आले होते. त्यानंतर वेगवेगळ्या चित्रपटांतून धनुषनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सध्या धनुषकडे हॉलीवूडचा द ग्रे मॅनचा प्रोजेक्ट आहे. त्याचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांनी मोठी दाद दिली. आता धनुषच्या चाहत्यांना द ग्रे मॅनचे वेध लागले आहे. येत्या वर्षी डिसेंबर अखेर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओविषयी सांगायचे झाल्यास त्यात, ख्रिस आपल्या सहकाऱ्यांसोबत निघाला असताना त्याला त्या कार्यक्रमामध्ये अचानक धनुष दिसतो. त्यानंतर त्यानं मनपूर्वक धनुषचं स्वागतही केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT