The Kapil Sharma Show Last Episode esakal
मनोरंजन

The Kapil Sharma Show Last Episode : कपिल शर्मा शो चा खेळ थांबणार! शेवटच्या एपिसोडची तारीख ठरली

कपिलनं अर्चना पुरनसिंग यांच्यासोबत इंस्टावर एक फोटो शेयर केला आहे. त्यात त्यानं आपल्या शो विषयी चाहत्यांना माहिती दिली आहे.

युगंधर ताजणे

The Kapil Sharma Show Last Episode : टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध कॉमेडी शो द कपिल शर्माची लोकप्रियता मोठी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा शो प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आला आहे. मात्र आता त्याविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे.

बॉलीवूड चित्रपटांचे प्रमोशन करणारा शो अशी ओळख गेल्या काही महिन्यांपासून कपिल शर्मा शो ची झाली होती. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्यावर टीकाही केली होती. तसेच ज्यावेळी एखाद्या मराठी चित्रपटाचे प्रमोशन करण्याची वेळ येते तेव्हा मात्र त्या शो च्या निर्मात्यांकडून म्हणावा असा प्रतिसाद मिळत नसल्याचे यापूर्वी दिसून आले होते. अशातच बॉलीवूडमधील काही निर्मात्यांनी या शो वर टीका केली होती.

काश्मीर फाईल्सच्यावेळी विवेक अग्निहोत्री, अनुपम खेर आणि मुकेश खन्ना यांनी कपिलच्या शो वर सडकून टीका केली होती. त्यानं यापूर्वी देखील काही चित्रपटांचे प्रमोशन त्याच्या शोमध्ये नकार दिला होता. याबरोबरच त्याच्या त्या मालिकेतील सहकलाकार जसे की सुनील ग्रोव्हरच्या बाबत कपिलची भूमिका चाहते, प्रेक्षक विसरलेले नाहीत. त्यामुळे की काय अनेकांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

आता कपिलचा शो बंद होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. गेल्या वर्षी या मालिकेचा चौथा सीझन सुरु झाला होता. आता तो बंद होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कपिल शर्माचे चाहते आहेत त्यांना मोठा धक्का बसला आहे. या शो चा शेवटचा एपिसोड हा दोन ते नऊ जुलैच्या दरम्यान प्रदर्शित होणार आहे.

या शेवटच्या एपिसोडमध्ये अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर आणि शोभिता धूलिपाला त्यांच्या द नाईट मॅनेजरच्या सीक्वेलच्या प्रमोशनसाठी येणार असल्याची माहिती आहे. यावेळी कपिलनं अर्चना पुरनसिंग यांच्यासोबत इंस्टावर एक फोटो शेयर केला आहे. त्यात त्यानं आपल्या शो विषयी चाहत्यांना माहिती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT