The kashmir files esakal
मनोरंजन

बच्चन पांडे केला बंद, काश्मिर फाईल्स सुरु: ओडिसातील थिएटरमध्ये राडा

The Kashmir Files: काश्मिर फाईल्सचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

सकाळ ऑनलाइन टीम

The Kashmir Files: काश्मिर फाईल्सचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली (Entertainment News) आहे. विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी (Pallavi Joshi) यांनी निर्मिती (vivek Agnihotry) केलेल्या काश्मिर फाईल्सची चर्चा देशभर होताना दिसत आहे. त्यावरुन वेगवेगळ्या कारणांवरुन वादही होताना दिसत आहे. काश्मिर फाईल्सवर आतापर्यत बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी (Bollywood News) आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात सध्या मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या (Aamir Khan) प्रतिक्रियेनं चाहत्यांचे लक्ष वेधले गेले आहे. मात्र यासगळ्यात ओडिसातील एका थिटएटरमध्ये काश्मिर फाईल्सवरुन मोठा राडा झाल्याची बातमी समोर आली आहे.

काश्मिर फाईल्स पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येनं थिएटरमध्ये गर्दी करु लागले आहेत. यापूर्वी एका थिएटरमध्ये हा चित्रपट सुरु असताना काही व्यक्तींनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. त्यावरुन दोन गटांत हाणामारी झाल्याचे दिसून आले होते. आज ओडिसातील थिएटरमध्ये झालेल्या वादानं पुन्हा एकदा तिच बाब अधोरेरखित झाली आहे. या घटनेमध्ये बच्चन पांडेची स्क्रिनिंग बंद पाडून द काश्मिर फाईल्सचे स्क्रिनिंग सुरु करण्याचे जबरदस्ती थिएटर मालकाला करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. यावेळी थिएटरमध्ये जय श्रीराम नावाच्या घोषणाही देण्यात आल्या होत्या.

तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्यानं अखेर थिएटरमालकाला तो शो बंद करावा लागला. याबाबत बॉलीवूड हंगामा नावाच्या पोर्टलनं माहिती दिली आहे. इलेक्स नावाच्या थिएटरमधील बच्चन पांडेचा शो यावेळी बंद पाडण्यात आला. आणि जय श्रीराम नावाच्या घोषणा देत काश्मिर फाईल्स चित्रपट लावण्याची मागणी करण्यात आली. भारतात राहायचं असल्यास आता थिएटरमध्ये काश्मिर फाईल्स लावण्याची मागणी करण्यात आली होती. यावेळी काही व्यक्तींची घोळका अचानक थिएटरमध्ये आला आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घालण्यास सुरुवात केला. जे प्रेक्षक त्याप्रसंगी बच्चन पांडे चित्रपट पाहत होते त्यांच्या या प्रकारामुळे विरस झाला. आणि त्यांनी त्यांना विचारणा केली.

त्या व्यक्तींनी बच्चन पांडे न पाहता काश्मिर फाईल्स पाहण्याची जबरदस्ती यावेळी त्या उपस्थित प्रेक्षकांना केल्यानं वाद निर्माण झाला होता. त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. गेल्या काही दिवसांपासून विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मिर फाईल्स नावाच्या चित्रपटाची मोठ्य़ा प्रमाणावर चर्चा सुरु आहे. दुसरीकड़े बॉक्स ऑफिसवर बच्चन पांडेची टक्कर काश्मिर फाईल्सबरोबर आहे. अशावेळी बच्चन पांडेला मोठा फटका बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूरमध्ये हायव्होलटेज ड्रामा! अर्ज मागे घेऊ नये म्हणून भाजप उमेदवाराला लोकांनी घरातच कोंडलं

Akol crime: अकोल्यात रेल्वेखाली उडी घेऊन प्रेमीयुगलानं संपवलं जीवन; सरत्या वर्षाला निरोप अन् उचलले टोकाचे पाऊल!

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे गिरीश महाजन यांच्या भेटीला

India Squad For New Zealand ODIs : ऋतुराज गायकवाडचा पत्ता कट, मोहम्मद शमी पुन्हा दुर्लक्षित! भारताच्या वन डे संघात अचंबित करणारे निर्णय...

Daily Good Habits: मन फ्रेश अन् अ‍ॅक्टिव ठेवण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेला ‘हा’ कानमंत्र पाळा, तणाव होईल गायब

SCROLL FOR NEXT