The Kerala Story Sonia Balani 
मनोरंजन

The Kerala Story : केरळ स्टोरीच्या सोनिया बलानीला जीवे मारण्याची धमकी!

माझ्यासारख्या हजारो युवतींनी मुलाखती दिल्या आहेत. ज्यांचे धर्म परिवर्तन केले आहे. हे कुणाला माहिती नाही.

युगंधर ताजणे

sonia balani the kerala story : केरळ स्टोरी या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद हा मोठा आहे. सोशल मीडियावर या चित्रपटावरुन होणारा वाद लक्ष वेधून घेतो आहे. यातच चित्रपटातील अभिनेत्रींना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा धक्कादायक प्रकार आता दिसून आला आहे.

आग्र्यामधील जयपूर हाऊसमध्ये एका कार्यक्रमाचे आय़ोजन करण्यात आले होते. त्यात द केरळ स्टोरीमधल्या सोनिया बलानीनं तिला जीवे मारण्याच्या ज्या धमक्या मिळत आहे त्याविषयी सांगितले आहे. केरळ स्टोरीचा उद्देश हा काही शंभत ते दोनशे कोटी कमावण्याचा नव्हताच. मात्र आता लोकांनी त्याकडे वेगळ्या दृष्टीनं पाहायला सुरुवात केली आहे.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

माझ्यासारख्या हजारो युवतींनी मुलाखती दिल्या आहेत. ज्यांचे धर्म परिवर्तन केले आहे. हे कुणाला माहिती नाही. त्याविषयी आम्ही जेव्हा चित्रपटातून वाचा फोडण्याचे काम केले त्याकडे काहींनी प्रोपगंडा म्हणून पाहिले. हे चुकीचे आहे. पहिल्यांदा तुम्ही चित्रपट तर पाहा मग त्यावर भाष्य करा असे मला सांगावेसे वाटते. चित्रपट आवडणं न आवडणं हा ज्याच्या त्याचा वैयक्तिक भाग आहे. मात्र आपण चित्रपट न पाहताच भाष्य करणे चुकीचे आहे. असे वाटते. अशी प्रतिक्रिया सोनियानं दिली आहे.

मी केरळ स्टोरी चित्रपटात काम करणे हे अनेकांना आवडेललं नाही. त्याचे परिणाम म्हणून मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे. आता लोकांनी तो चित्रपट पाहून सांगावे त्यात चुकीचे काय आहे. आम्ही जेव्हा त्या पीडितांशी बोललो तेव्हा आम्हाला राहवले नाही. त्यांना ज्या अन्यायाला सामोरं जावं लागलं ते भयानक होतं हे आवर्जुन सांगावेसे वाटते. असे मत सोनियानं व्यक्त केलं आहे.

अभिनेत्रीला जीवे मारण्याची मिळतेय धमकी...

अभिनेत्री सोनिया बलानीला जीवे मारण्याची धमकी मिळताच तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी केरळ स्टोरीमधील अभिनेत्रींना देखील जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मला जेव्हा धमकी मिळाली तेव्हा मोठा धक्काच बसला. मात्र काही लोकांचा केरळ स्टोरीला मिळणारा प्रतिसाद पाहता त्यापुढे धमक्यांचे काही वाटत नाही. आपण योग्य मार्गावरच आहोत असे वाटते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT