The Kerala Story, The Kerala Story news, The Kerala Story update, sonia balani. sonia balani news SAKAL
मनोरंजन

मुस्लिम भूमिका साकारल्याने झाला अपमान आणि आता... The Kerala Story मधल्या अभिनेत्रीचं दुःख

याच भूमिकेसाठी सोनियाला जनतेकडून मात्र अपमानास्पद वागणूक मिळाली.

Devendra Jadhav

The Kerala Story News: द केरळ स्टोरी सिनेमा सोशल मीडियावर चर्चेत आहे. सिनेमाची आता बॉक्स ऑफिसवर २०० करोडकडे यशस्वी वाटचाल सुरु आहे. द केरळ स्टोरी सिनेमाबद्दल अनेक वाद झाला.

द केरळ स्टोरी सिनेमात आसिफा या खलनायिकेची भूमिका अभिनेत्री सोनिया बलानीने साकारलीय.

सोनियाने तरुणींचं ब्रेनवॉश करणाऱ्या आसिफची भूमिका तिच्या उत्कृष्ट अभिनयाने दमदार साकारली. पण याच भूमिकेसाठी सोनियाला जनतेकडून मात्र अपमानास्पद वागणूक मिळाली.

(The Kerala Story actress Sonia Balani reveals she’s been getting abusive messages on playing a muslim girl who converts others)

सोनिया म्हणाली, “मला अपमानास्पद मेसेज येत आहेत कारण मी चित्रपटात सर्व देवांबद्दल अनेक मोठी विधानं केली.

मला माहित आहे की सिनेमात असा एक भाग आहे जो पाहून कोणाला आनंद होणार नाही, परंतु जर त्यांना हे समजले की ही एक सत्य कथा आहे आणि हेतू फक्त त्या दहशतवादी गटांबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे, तर मला आशा आहे की त्यांना याबद्दल सकारात्मक वाटेल.

सोनिया पुढे म्हणाली, "मी ट्रोलिंग आणि सिनेमावरील बंदी अशा गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी सकारात्मक बाजूंवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत आहे.

चहा विक्रेत्यापासून ते प्रत्येक सामान्य माणसापर्यंत प्रत्येकजण चित्रपटाला खूप पाठिंबा देत आहे,” असं सोनिया म्हणाली. अशाप्रकारे द केरळ स्टोरी मधील भूमिकेबद्दल सोनियाने खुलासा केला.

द केरळ स्टोरीचा विरोध करणारे त्याला प्रोपेगेंडा सिनेमा म्हणत आहेत. केरळमधनं महिलांच्या धर्मांतराच्या संख्येविषयी सिनेमात दावा केल्यानंतर वादाचं वादळ उठलं होतं.

सिनेमाच्या टीझरमध्ये दावा केला होता की राज्यात ३२ हजार महिलांचे धर्मांतर करुन त्यांना आयएसआयएस या दहशतवादी संघटनेत दाखल केलं गेलं.

पण राज्यातून फक्त ६ महिलांच्या बाबतीत असं घडल्याचा रेकॉर्ड आहे आणि यातील फक्त एक हिंदू महिला होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT