The Kerala Story Controversy Instagram
मनोरंजन

The Kerala Story : 'तुम्हाला जर थोडी अक्कल...' केरळ स्टोरीला प्रोपगंडा म्हणणाऱ्याला दिग्दर्शकानं फटकारलं!

चित्रपट प्रदर्शित होताच त्याला मिळालेला प्रतिसादही मोठा आहे. सोशल मीडियावर त्यावरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाणही आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

The Kerala Story Ashok Pandit Answer : द केरळ स्टोरीवरुन सध्या मोठ्या प्रमाणात वाद होताना दिसतो आहे. लव जिहाद, इसीस सारख्या वेगळ्या विषयाची मांडणी करत या चित्रपटानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. चित्रपट प्रदर्शित होताच त्याला मिळालेला प्रतिसादही मोठा आहे. सोशल मीडियावर त्यावरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाणही आले आहे. यासगळ्यात चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी एकाला चांगलेच फटकारले आहे.

चार मुलींच्या धर्मांतरणाची गोष्ट सांगणाऱ्या द केरळ स्टोरीवरुन निर्माते विपुल शाह आणि दिग्दर्शक सेन यांच्यावर जोरदार टीका होत आहे. दुसरीकडे त्यांनी एका वेगळ्या विषयाची मांडणी करत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतल्याप्रकरणी कित्येकांनी त्यांचे कौतूकही केले आहे. द केरळ स्टोरीला प्रोपंगडा म्हणणाऱ्यांना यापूर्वी चित्रपटातील मुख्य अभिनेत्री अदा शर्मानं देखील फटकारले होते. तिनं गुगलवर जाऊन इसिस, लव जिहाद हे दोन शब्द टाईप करुन पाहा, तुम्हाला आम्ही काय म्हणतो आहोत हे कळेल. अशी प्रतिक्रिया तिनं दिली होती.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

द केरळ स्टोरीला बॉक्स ऑफिसवर मिळणारा प्रतिसाद जोरदार आहे. या चित्रपटानं तीन दिवसांत पन्नास कोटींचा टप्पा पार केला आहे. काही राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. दुसरीकडे तामिळनाडू, पश्चिम बंगालमध्ये या राज्यांमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. अशा प्रकारचा संमिश्र प्रतिसाद केरळ स्टोरीला मिळालेला दिसतो आहे. सध्या सोशल मीडियावर केरळ स्टोरीला प्रोपगंडा म्हणणाऱ्यांची संख्या वाढते आहे. यावर दिग्दर्शकानं दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.

पत्रकार मोहम्मद जुबैरनं ट्विट केलं आहे. त्यानं लिहिलं आहे की, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी कर्नाटकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या द केरळ स्टोरीच्या स्क्रिनिंगमध्ये भाग घेतला होता. त्यांना माहिती आहे की, कर्नाटकामध्ये आपल्याला मतदान हवे असल्यास अशाप्रकारच्या चित्रपटातून भीतीदायक वातावरण निर्मिती करणे गरजेचे आहे. यावर प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक अशोक पंडित यांनी जुबैरला जशास तसे उत्तर दिले आहे.

पंडित यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये, तू पहिल्यांदा हा चित्रपट पहा म्हणजे तुला थोडी अक्कल येईल. असे म्हटले आहे. आम्हाला माहिती आहे की, पहिल्यांदा कश्मिर फाईल्स आणि आता द केरळ स्टोरीसारख्या चित्रपटांनी तुमच्या टोळीला चांगलाच धडा शिकवला आहे. यावेळी पंडित यांनी काश्मिर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना देखील यावर उत्तर देण्यासाठी आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT