The Kerala Story Box office Collection Instagram
मनोरंजन

The Kerala Story Box office Collection: बाबो..समोर येईल त्या सिनेमाला आपटतोय द केरळ स्टोरी..कमाईचा तांडव सुरुच

निव्वळ ४० करोडच्या बजेटमध्ये बनलेल्या 'द केरळ स्टोरी'ची केवळ १५ दिवसांतील कमाई हैराण करून सोडणारी आहे.

प्रणाली मोरे

The Kerala Story Box office Collection: 'द केरळ स्टोरी' आता एक असा सिनेमा बनला आहे ज्यानं लोकांना त्याच्या कथेवर विचार करायला भाग पाडलं आहे. काही लोकांचे म्हणणे आहे की हा पूर्णपणे एकच बाजू दाखवलेला सिनेमा आहे. तर काही लोक याला हिंदू-मुस्लिम संघर्षाची कहाणी म्हणताना दिसत आहेत.

'द केरळ स्टोरी'ची चर्चा आता घराघरात होत आहे. या सिनेमामुळे वाद निर्माण झाला असला तरी त्याचा फायदाच झाला आहे. सिनेमाचं मोठं प्रमोशन झालं आणि सर्वसामान्यांपासून दिग्गजांपर्यंत हा सिनेमा पोहोचला आहे.(The Kerala Story Box office Collection Overtake 6 big budget movie)

सिनेमाच्या रिलीजचा १६ वा दिवस आहे आणि लागोपाठ १५ दिवस हा सिनेमा बॉक्सऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. फक्त ४० करोडच्या बजेटमध्ये बनलेल्या 'द केरळ स्टोरी'च्या दमदार कमाईनं सगळ्यांनाच हैराण करुन सोडलं आहे.

बोललं जात आहे की लवकरच हा सिनेमा २०० करोडची कमाई करेल. आता पर्यंत 'द केरळ स्टोरी' सिनेमानं १७० करोडहून अधिक केली आहे. या सिनेमानं बॉक्सऑफिसवर रिलीज झालेल्या तब्बल ६ सिनेमांना कमाईच्याबाबतीत मागे टाकलं आहे.

सलमान खानपासून रणबीर कपूर पर्यंतच्या सिनेमांनी देखील कमाईच्या बाबतील द केरळ स्टोरीपुढे नांगी टाकली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 'द केरळ स्टोरी'नं १५ व्या दिवशी ६ करोडचं कलेक्शन केलं आहे. १५ दिवसांच्या हिशोबानं ही कमाई खूप चांगली मानली जातेय.

अर्थात शनिवार आणि रविवारचे आकडे या सिनेमाला २०० करोडच्या क्लबमध्ये एन्ट्री करण्यासाठी मोठं सहकार्य करू शकतात. १५ दिवसांचं टोटल कलेक्शन पाहिलं तर आतापर्यंत या सिनेमानं १७७.७२ पेक्षा अधिक कमाई केली आहे.

१० व्या दिवशी द केरळ स्टोरीनं सगळ्यात अधिक कमाई केली होती. सिनेमानं २३ करोड कमावून रेकॉर्ड केला होता. तर ९ व्या दिवशीची कमाई देखील मेकर्सना हॅप्पी करणारी होती. या सिनेमाच्या टॅक्स फ्री ची चर्चा देखील होत आहे.

अनेक ठिकाणी सरकारनं या सिनेमाला विनामूल्य केलं आहे. तर काही राज्याच्या सरकारनं या सिनेमाला टॅक्स फ्री केलं आहे. अशामध्ये अभिनेत्री अदा शर्मा साठी 'द केरळ स्टोरी' आता करिअरमधला मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police Recruitment : पोलिस भरतीत ‘शॉर्टकट’चा स्फोट! शक्तीवर्धक पेय घेताच उमेदवाराचा मैदानावर धिंगाणा, थरारक क्षणांनी सर्वच शॉक

IPL 2026: ऋतुराज गायकवाडला संजू सॅमसनमुळे CSK संघात जाणवतोय धोका? माजी कर्णधाराचा खळबजनक दावा

Gemma 4 : इंटरनेटची गरज संपली! गुगलने लॉन्च केले Gemma 4; आता डेटा संपला तरी मोबाईल चालेल सुपरफास्ट, कसं वापरायचं पाहा

Gold Rate: सोनं 30 हजारांनी स्वस्त! चांदीही 1.6 लाखांनी घसरली; आता भाव वाढणार की अजून पडणार?

Parbhani News: ही तर दिवसाढवळ्या परभणीकरांची लूटच!; टॅंकर माफियांकडून नागरिक वेठीस; हजार लिटरसाठी घेताहेत ५०० रुपये

SCROLL FOR NEXT