The Kerala Story Movie Controversy Esakal
मनोरंजन

The Kerala Story: केरळमध्ये ३२ हजार मुलींनी धर्मांतर केले सिद्ध करा, एक कोटी घेऊन जा! थरुर यांचे चॅलेंज

Vaishali Patil

सध्या मनोरजंन विश्वात अदा शर्मा स्टारर सुदीप्तो सेन दिग्दर्शित 'द केरला स्टोरी' या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. 'द केरला स्टोरी'च्या ट्रेलरने इंटरनेटवर तुफान धुमाकूळ घातला आहे. केवळ मनोरजंन विश्वच नाही तर राजकिय विश्वातही बरिच चर्चा सुरु झाली. हा चित्रपट रिलिजपुर्वीच वादात अडकला आहे.

ही कहानी केरळ राज्यात बेपत्ता झालेल्या ३२,००० महिलांमागील सत्य घटनेवर आधारित असून, 'द केरळ स्टोरी'चा ट्रेलर प्रभावी आणि सत्य कथेवर आधारित असल्याचं सांगण्यात येत आहे. केरळमधील गैर-मुस्लिम मुलींनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि ISIS सारख्या दहशतवादी संघटनांच्या तावडीत सापडल्याची कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे. यातील मात्र, 32 हजारांच्या आकड्याबाबत गदारोळ सुरू झाला आहे.

काँग्रेस नेते आणि तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांनी रविवारी 'द केरळ स्टोरी' चित्रपटाबाबत ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली होती. या चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना त्यांनी चित्रपटावर टीका केली. शशी थरूर यांनी ट्विट केले की, "ही 'तुमची' केरळ स्टोरी असू शकते. ही 'आमची' केरळ स्टोरी नाही.

आता त्यातच पुन्हा शशी थरुर यांनी ट्विट केले आहे. यासोबतच त्याने एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये 32 हजार मुलींचे धर्मांतर करून सीरियाला जाणं हे सिद्ध करा असे लिहिलं आहे. तुम्ही पुरावे सादर करा. असं म्हणत हे आव्हान पूर्ण करणाऱ्याला त्यांनी एक कोटी रुपयांचे आश्वासन देण्यात आले आहे.

आपल्या ट्विटमध्ये शशी थरूर यांनी लिहिले आहे की, “जे लोक केरळमध्ये 32,000 मुलींनी इस्लाम धर्म स्वीकारल्याचा मुद्दा उपस्थित करत आहेत, त्यालोकांसाठी केस सिद्ध करण्याची आणि पैसे कमावण्याची मोठी संधी आहे. की ते या आव्हानाला सामोरे जातील का किंवा कोणतेही पुरावे नाहीत कारण कोणतेही अस्तित्वात नाही? असं म्हणत शशी थरूर यांनी पोस्टमध्ये 'नॉट अ केरळ स्टोरी' असा हॅशटॅग दिला आहे.

शशी थरूर यांच्या या पोस्टनुसार, ज्यांना हे आव्हान स्वीकारून एक कोटी रुपयांचं बक्षीस मिळवायचं आहे ते ४ मे रोजी केरळमधील प्रत्येक जिल्ह्यातील काउंटरवर पुरावे सादर करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT