The Kerala Story Controversy Instagram
मनोरंजन

The Kerala Story: 'एकट्यानं घराबाहेर पडू नकोस..'; 'द केरळ स्टोरी' सिनेमाच्या टीम मेंबरला धमकी..वाचा सविस्तर

'द केरळ स्टोरी' सिनेमाच्या टीम मेंबरला धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांकडून त्याला सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

प्रणाली मोरे

The Kerala Story विषयीचा वाद काही थांबायचं नाव घेताना दिसत नाही. आता बातमी आहे की या सिनेमाच्या टीम मेंबरला धमकी मिळाली आहे ज्यानंतर मुंबई पोलिसांकडून त्याला सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे की 'द केरळ स्टोरी'च्या एका क्रू मेंबला एका अज्ञात फोन नंबरहून धमकीचा मेसेज केला गेला आहे. 'द केरळ स्टोरी'चा दिग्दर्शक सुदीप्तो सेननं मुंबई पोलिसांना माहिती दिली आहे की सिनेमाच्या टीम मेंबर्सपैकी एकाला अज्ञात नंबरहून धमकीचा मेसेज आला आहे.

पोलिसांनी सांगितलं की,मेसेज पाठवणाऱ्यानं त्या सिनेमाच्या टीम मेंबरला धमकी देत म्हटलं आहे की,''एकट्यानं घराबाहेर पडू नकोस. तुम्ही ही गोष्ट समोर आणून चांगलं काम केलेलं नाही''.

धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या टीम मेंबरला सुरक्षा दिली आहे,पण त्यासंदर्भात कोणतीही एफआयआर दाखल केली गेलेली नाही कारण यासंबंधित कोणतीही लेखी तक्रार करण्यात आलेली नाही. (The Kerala story crew member receives threat no fir mumbai police provides security)

दुसरीकडे,पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल कॉं ग्रे स सरकारनं या वादग्रस्त सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी आणली आहे. राज्य सरकारनं राज्याची शांती या सिनेमानं बिघडू शकते,हिंसेचे प्रकार होऊ शकतात हे कारण पुढे करत 'द केरळ स्टोरी' सिनेमावर बंदी आणली आहे.

द केरळ स्टोरी सिनेमावर बंदी आणणारं पश्चिम बंगाल हे पहिलं राज्य बनलं आहे. हा तीन महिलांच्या संघर्षावर आधारित सिनेमा आहे. लग्नासाठी जबरदस्ती करुन मुलींचे धर्म परिवर्तन केलं जातं आणि त्यानंतर त्यांना तस्करीच्या माध्यमातून आयएसआय कॅंपमध्ये पोहोचवलं जातं अशी कथा या सिनेमात दाखवण्यात आली आहे.

सिनेमामुळे राजकीय स्तरावर देखील मोठ्या घडामोडी झाल्या आहेत आणि अनेकांनी सिनेमाला नावंही ठेवली आहेत. बंगालमध्ये सिनेमावर बंदी आणली गेली आहे. भाजपाचं शासन असलेल्या मध्यप्रदेशमध्ये सिनेमाला टॅक्स फ्री करण्यात आलं आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सिनेमाविरोधात सूर काढत याला 'आरएसएसचा प्रचार' म्हणून संबोधलं आहे.

सिनेमावर बंदी आणण्याच्या आपल्या निर्णयावर ममता बॅनर्जी म्हणाल्या,''हा निर्णय केवळ समाजात कोणतीही हिंसेची घटना घडू नये ,वाद उसळू नये म्हणून घेण्यात आला आहे. तसंच,राज्यात शांतिव्यवस्था कायम ठेवण्यासाठी हे गरजेचं होतं''.

द केरळ स्टोरी सिनेमात अदा शर्मा,सिद्धि इडनानी,योगिता बिहानी,सोनिया बलानी प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT