Khupte Tithe Gupte, Khupte Tithe Gupte news, raj thackeray, awadhut gupte, the kerala story full movie SAKAL
मनोरंजन

Khupte Tithe Gupte: द केरळ स्टोरीवर बंदी योग्य की अयोग्य? राज ठाकरेंचं रोखठोक वक्तव्य

अवधूत गुप्ते यांनी विचारलेल्या स्पष्ट प्रश्नांची राज ठाकरेंनी रोखठोक उत्तरं दिली.

Devendra Jadhav

Khupte Tithe Gupte Raj Thackeray News: सध्या खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमाची प्रचंड चर्चा आहे. खुपते तिथे गुप्ते शोचा नवीन सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नवीन सिझनच्या पहिल्याच एपिसोडला राज ठाकरे हजेरी लावणार आहेत. राज ठाकरे यांनी अवधूत गुप्तेंच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. अवधूत गुप्ते यांनी विचारलेल्या स्पष्ट प्रश्नांची राज ठाकरेंनी रोखठोक उत्तरं दिली.

(The Kerala Story movie banned Right or Wrong? Raj Thackeray's statement in khupte tithe gupte)

अवधूत गुप्तेंनी राज ठाकरेंना द केरळ स्टोरी बद्दल प्रश्न विचारला.. केरळ स्टोरी सिनेमावर पश्चिम बंगालमध्ये बंदी घातली. तर सिनेमांवर बंदी घालणे योग्य कि अयोग्य?

या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले.. जर सेन्सॉरने सिनेमाला प्रमाणपत्र दिलं असेल तर विरोध करणारा मी कोण अशी प्रतिक्रिया अवधूत गुप्ते यांनी दिली. आणि त्यांनी सिनेमाला विरोध करणं चुकीचं आहे असं सांगितलं.

The Kerala Story सिनेमा जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरला आहे. या सिनेमानं रिलीज आधीपासून देशभरात गोंधळ घातला होता आणि त्याचे पडसाद जगभरात उमटलेले आपण पाहिले.

अर्थात केरळमधून ३२ हजार मुलींचं अचानक गायब होणं.. त्यामागचं धक्कातंत्र आणि त्याला असलेली दहशतवादाची पार्श्वभूमी एवढं सगळं सिनेमातून मांडल्यावर आणखी काय घडणार होतं.

पण एवढं सगळं सिनेमाच्या बाबतीत नकारात्मक घडूनही 'द केरळ स्टोरी' सिनेमानं बॉक्सऑफिसवर तगडी कमाई केली. २०-२५ करोडच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमानं २०० करोडचा टप्पा गाठला यातच सिनेमाचं मोठं यश आलं.

'द केरळ स्टोरी' सिनेमाच्या बाबतीत आता एक नवी अपडेट समोर आली आहे. सिनेमाचे निर्माते विपुल शहा यांनी एका मुलाखतीत द केरळ स्टोरी सिनेमाचा सीक्वेल येणार असल्याची मोठी हिंट दिली आहे.

खुपते तिथे गुप्ते शो चा नवीन सिझन सुरु होतोय. या सीझनमध्ये राज ठाकरे सहभागी झाले आहेत. अवधूत गुप्ते अनेक गोष्टींच्या बाबतीत राज ठाकरेंना बोलतं करणार आहेत.

राज ठाकरे सुद्धा अवधूत गुप्ते यांनी विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं देणार आहेत. ४ जुन पासुन रात्री ९ वाजता खुपते तिथे गुप्ते चा नवीन सीझन भेटीला पाहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ, नेमकं काय घडलं ?

Ganesh Festival : राज्योत्सव संहितेची गरज; गणेशोत्सवाच्या स्वरूपावर शासनाची भूमिका स्पष्ट करावी

Latest Marathi News Updates : मराठवाड्यात आज कुणबी प्रमाणपत्रांच वाटप

Chandrashekhar Bawankule: बनावट कुणबींची पडताळणी! कागदपत्रांच्या आधारावर प्रमाणपत्र देऊ नयेत, बावनकुळे यांचे निर्देश

विज्ञान, शेती, माती, संस्कृती जपणारे अणुशास्त्रज्ञ शिवराम भोजे कण होते?, असा आहे 'शिवार ते शास्त्रज्ञ' प्रवास

SCROLL FOR NEXT