the kerala story esakal
मनोरंजन

The Kerala Story : पश्चिम बंगाल, तामिळनाडूमध्ये बंदी, अमेरिका-कॅनडामध्ये झाला प्रदर्शित!

द केरळ स्टोरीवर भारतातील काही राज्यांमध्ये प्रदर्शनास बंदी घालण्यात आली आहे. त्यामध्ये पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे.

सकाळ डिजिटल टीम

The Kerala Story, The Kerala Story Box Office collection : द केरळ स्टोरीवर भारतातील काही राज्यांमध्ये प्रदर्शनास बंदी घालण्यात आली आहे. त्यामध्ये पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. यावर सर्वोच्च न्यायालयानं देखील या दोन्ही राज्यांना चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी का घालण्यात आली, त्यामागील कारण काय अशी नोटीस पाठवून विचारणा केली आहे.

यंदाच्या वर्षातील सर्वाधिक चर्चेतील चित्रपट म्हणून केरळ स्टोरीचा उल्लेख करावा लागेल. या चित्रपटानं आठवड्याभरात ७७ कोटींची कमाई केली आहे. सोशल मीडियावर या चित्रपटावरुन वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा होत आहेत. काहींनी त्याचे कौतूक केले आहे. तर काहींनी हा चित्रपट प्रोपगंडा असल्याचे म्हटले आहे. आता भारताबाहेर अमेरिका, कॅनडा सारख्या देशांमध्ये केरळ स्टोरी पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत असल्याची बातमी समोर आली आहे.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

अमेरिका, कॅनडामध्ये १२ मे रोजी द केरळ स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. परदेशात २०० हून अधिक स्क्रिन्सवर प्रेक्षकांना केरळ स्टोरी पाहता येणार आहे. याविषयी प्रतिक्रिया देताना दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी म्हटले आहे की, ही आमच्यासाठी खूप आनंदाची बाब असून प्रेक्षकांचा चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद सकारात्मक आहे. आमच्यासाठी हे खास ध्येय होतं ज्यात आम्ही यशस्वी होत आहोत. ही समाधानाची गोष्ट असल्याचे सेन यांनी म्हटले आहे.

ज्या मुद्दयांवर केरळ स्टोरी आधारित आहे ती गोष्ट भारतामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. मात्र ते जेव्हा चित्रपटांतून मांडण्यात आले तेव्हा त्याला होणारा विरोध खूप काही सांगून जाणारा आहे. भारतानं ही गोष्ट कायमच नाकारली आहे. मात्र ती झालीच नाही असे म्हणता येणार नाही. आम्हाला धर्मांतर, त्यातून होणाऱ्या नकारात्मक गोष्टी जगासमोर मांडणे हे जास्त महत्वाचे वाटले. म्हणून आम्ही अधिक प्रयत्नशील आहोत. अशी प्रतिक्रिया सेन यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Marriage Scheme : शेतकरी वराशी विवाह करणाऱ्या वधूच्या नावावर 10 लाख ठेवा; शेतकरी संघाची मागणी, नोकरीत आरक्षणाचाही आग्रह

T20 World Cup: ऑस्ट्रेलियाला स्पर्धेतून बाहेर करून Super-8 मध्ये पोहचलेल्या झिम्बाब्वेचं चाहत्यांसोबत अनोखं सेलिब्रेशन; पाहा Video

YouTube Down Worldwide: जगभरातील लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्म you tube अचानक बंद

Latest Marathi News Live Update : चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात लवकरच निवडणुका

आजचे राशिभविष्य - 18 फेब्रुवारी 2026

SCROLL FOR NEXT