The Kerala Story  esakal
मनोरंजन

The Kerala Story : 'लोकांना ठरवू द्या, काय चांगलं काय वाईट तुम्ही...' सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं!

'द केरळ स्टोरी' वरुन आता वेगळ्या वादाला सुरुवात झाली आहे. लव जिहाद सारख्या विषयाची मांडणी करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

The Kerala Story Supreme Court refuses : 'द केरळ स्टोरी' वरुन आता वेगळ्या वादाला सुरुवात झाली आहे. लव जिहाद सारख्या विषयाची मांडणी करण्यात आली आहे. मात्र त्यावरुन सोशल मीडियावर उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारा विषय आणि चित्रपट असा ठपका ठेवत काहींनी द केरळ कोर्टाच्या विरोधात कोर्टात धाव घेतली आहे.

यापूर्वी द काश्मीर फाईल्स चित्रपटावरुन मोठा वाद झाला होता. सोशल मीडियावर देखील त्यावरुन मोठा गदारोळ झाला होता. देशभरात एका वेगळ्याच प्रकारचे वातावरण या चित्रपटावरुन झाले होते. कित्येकांनी या चित्रपटाच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. आता पुन्हा एकदा केरळ स्टोरीच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. उद्या हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सीबीएफसीनं द केरळ स्टोरीला चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी प्रमाणपत्र कसे काय दिले, असा प्रश्न एका याचिकाकर्त्यांनं आपल्या याचिकेमध्ये केला असून या चित्रपटाच्या विरोधात कोर्टात दाद मागितली आहे. तसेच या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी असेही म्हटले होते. आता तर सर्वोच्च न्यायालयानं या याचिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहे. सोशल मीडियावर कोर्टानं काय म्हटले आहे हे व्हायरल झाले असून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

कोर्टानं म्हटलं आहे की, तुम्ही त्या चित्रपटांमध्ये काम केलेल्या कलाकारांचा विचार करण्याची गरज आहे. त्यांच्या कष्टाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. त्यामुळे बाजारपेठेतून या चित्रपटावर जो विचार लोकं करतील तो करतील. त्यांनाच ठरवू द्या चित्रपटाविषयी. अशा प्रकारचे निरीक्षण नोंदवत कोर्टानं सीबीएफसीच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला आहे. आणि ती याचिका फेटाळून लावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिषेक

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

Rupali Chakankar: तर लैंगिक छळाची घटना टळली असती; रूपाली चाकणकर, २०२३ मध्ये दाखल केलेल्या तक्रारीची दखल का घेतली नाही?

SCROLL FOR NEXT