the lady killer trailer arjun kapoor bhumi pednekar romantic thriller movie SAKAL
मनोरंजन

The Lady Killer: अर्जुन कपूर - भुमी पेडणेकरची रोमॅंटिक केमिस्ट्री! 'द लेडी किलर'चा ट्रेलर रिलीज

भुमी पेडणेकर - अर्जुन कपुर यांची भन्नाट केमिस्ट्री द लेडी किलर सिनेमात दिसतेय

Devendra Jadhav

The Lady Killer Trailer: गेल्या अनेक दिवसांपासुन बॉलिवुडमध्ये विविध विषयांवरचे नवनवीन सिनेमे भेटीला येत आहेत. जवान, द व्हॅक्सीन वॉर, गदर २, ओह माय गॉड २ असे अनेक सिनेमे प्रेक्षकांना आवडले.

अशातच बॉलिवुडमध्ये आणखी एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा म्हणजे द लेडी किलर. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.

(the lady killer trailer arjun kapoor bhumi pednekar romantic thriller movie)

द लेडी किलर चा रहस्यमयी ट्रेलर भेटीला

द लेडी किलर सिनेमाच्या ट्रेलरची सुरुवात होते जेव्हा अर्जुन एका महाराजाला भेटण्यासाठी एका हिल स्टेशनमधील शाही बंगल्यावर पोहोचतो. तो त्या बंगल्यात भूमीला भेटतो. दोघांमध्ये रोमान्स होतो.

पुढे अर्जुन आणि भुमीची प्रेमकथा जसजशी पुढे सरकत जाते तसतशी अनेक रहस्य उलगडताना दिसतात. ट्रेलरच्या शेवटी अर्जुन म्हणतो, "पोलीस दरवाजा तोडून घरात घुसतील आणि आपल्याला नग्न अवस्थेत पकडले जाईल”

यावर भूमी त्याला उत्तर देते, “मी तुला सांगितले होते माझ्या प्रतिष्ठेची थट्टा मांडू नको” असं म्हणत भुमीने अर्जुनकडे पिस्तूल रोखलेले दिसते.

द लेडी किलरची रिलीज डेट

द लेडी किलरच्या ट्रेलरमध्ये अर्जुन आणि भूमी यांच्यात अनेक किसींग सीन्स पाहायला मिळतात. ट्रेलरमध्ये या दोघांची भन्नाट रोमॅंटीक केमिस्ट्री पाहायला मिळते.

द लेडी किलरचं दिग्दर्शन अजय बेहेल यांनी केलंय. हा सिनेमा ३ नोव्हेंबरला संपुर्ण भारतात प्रदर्शित होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT