Natya Parishad, Natya Parishad election, sharad pawar, uday samant, Natya Parishad election updates, prashant damle, uday samant
Natya Parishad, Natya Parishad election, sharad pawar, uday samant, Natya Parishad election updates, prashant damle, uday samant SAKAL
मनोरंजन

Natya Parishad: नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाचं राजकारण तापलं, शरद पवार आणि उदय सामंत यांची युती?

Devendra Jadhav

Natya Parishad Election Update Sharad Pawar & Uday Samant News: एखाद्या राजकीय निवडणुकी इतकं महत्व प्राप्त झालेली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक अखेर रविवार १६ एप्रिल रोजी पार पडली.

या निवडणुकीत प्रशांत दामले यांचं रंगकर्मी तर आणि प्रसाद कांबळी यांचे आपलं पॅनल एकमेकांविरोधात उभं ठाकलं होतं.

अखेर या निवडणुकीत प्रशांत दामले यांनी बाजी मारली. अजूनही नाट्यपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी संपलेली नाही.

(The politics of Natya Parishad's presidency heated up, Sharad Pawar and Uday Samant's alliance?)

नुकतंच शरद पवार यांनी ट्विटरवर एक पोस्ट केलीय. "अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीत ज्येष्ठ कलाकार प्रशांत दामले यांचे रंगकर्मी नाटक समूह पॅनल विजयी ठरले. पॅनलमधील विजयी उमेदवारांनी आज मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली.

त्यांना पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. या भेटीच्या वेळी मंत्री श्री. उदय सामंत देखील उपस्थित होते." अशी पोस्ट शरद पवार यांनी केलीय.

यावेळी शरद पवार आणि उदय सामंत यांच्यात नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याविषयी चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय.

शरद पवार नाटय परिषदेचे विश्वस्त असल्याने मंत्री उदय सामंत (Uday Samant) अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या चर्चेसंदर्भात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

'अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदे'च्या निवडणुकीत प्रशांत दामलेंच्या 'रंगकर्मी नाटक समूहा'ने बाजी मारली आहे.

'रंगकर्मी नाटक समूहात' एका पेक्षा एक दर्जेदार उमेदवारांचा समावेश होता. 'बदल हवा...पॅनल नवा... रंगकर्मींसाठीच हवाच हवा', असं म्हणत रंगकर्मी नाटक समूहाने प्रचार केला होता.

वैजयंती आपटे, विजय केंकरे, विजय गोखले, दिलीप जाधव, प्रशांत दामले, अजित भुरे, सविता मालपेकर, सुशांत शेलार, सयाजी शिंदे आणि विजय सूर्यवंशी हे नाट्यकर्मी 'रंगकर्मी नाटक समूहा'चे उमेदवार होते.

आता निवडणूक झाल्यावर यात प्रशांत दामले आणि अजित भुरे यांच्यात अध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

त्यामुळे अजित भुरे कि प्रशांत दामले या दोघांपैकी कोण नाट्य परिषदेचा नवीन अध्यक्ष होणार हे थोड्याच दिवसांमध्ये कळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : धैर्यशील माने-सत्यजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

MI Playoffs Chances : बुडत्या मुंबईचं थालाच्या चेन्नईकडे लक्ष! MI फॅन्स निराश होऊ नका... अजूनही होता येईल क्वालिफाय?

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

SCROLL FOR NEXT