Siddhanth Kapoor was the DJ at the rave party! This video is becoming fiercely viral on the internet
Siddhanth Kapoor was the DJ at the rave party! This video is becoming fiercely viral on the internet Google
मनोरंजन

Siddhanth Kapoor Drugs Case: रेव्ह पार्टीतील 'तो' Video viral, मोठा खुलासा

प्रणाली मोरे

शक्ती कपूर(Shakti kapoor) यांचा मुलगा सिद्धांत कपूर(Siddhant Kapoor) याला रविवारी रात्री उशिरा बंगळुरु येथे पोलिसांनी एका रेव्ह पार्टीत(Rave Party) ड्रग्ज सेवन(Drug Case) केल्या प्रकरणात अटक केली आहे. त्यानं ड्रग्ज सेवन केल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे. आता त्या रेव्ह पार्टीतील एक व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर तो भलताच व्हायरल झाला आहे.(Siddhanth Kapoor was the DJ at the rave party! This video is becoming fiercely viral on the internet)

त्या व्हिडीओत सिद्धांत डिजे(D.J) म्हणून गेला होता याचा खुलासा झाला आहे. कारण त्यात तो डिजे Console हॅन्डल करताना दिसत आहे. सिद्धांत सोबत आणखी पाच जणांना ड्रग्ज सेवन प्रकरणी अटक केल्याचं बोललं जात आहे. जवळपास पंचवीस जणांच्या पोलीस टीमनं एका फाइव्ह स्टार हॉटेलमधील त्या पार्टीवर छापा घालण्यासाठी सापळा रचला होता. पोलिसांना या पार्टीत ड्रग्ज सेवन केलं जात आहे याची खबर आधीच मिळाली होती. जवळपास त्या रेव्ह पार्टीत ३५ जणांना ताब्यात घेतलं गेलं होतं. आणि त्यांची ड्रग्ज सेवन प्रकरणात लॅबमध्ये नेऊन टेस्ट देखील करण्यात आली. त्यामधून ६ सहा जणांनी ड्रग्ज सेवन केल्याचं समोर आलं,ज्यामध्ये एक सिद्धांत कपूर देखील होता.

दुसरा एक व्हिडाओ समोर आला आहे त्यात पोलिस पार्टीवर छापा टाकल्यानंतर तेथील उपस्थितांशी बोलत आहेत. पोलिसांनी खबर मिळाल्यानंतर लगेच अॅक्शन घेत हा छापा टाकला होता. सिद्धांतनं पार्टीत आल्यानंतर ड्रग्जचं सेवन केलं होतं की पार्टीत येण्याआधीच त्यानं ड्रग घेतलं होतं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

सुशांत सिंग राजपूतनं आत्महत्या,तो ड्रग्ज सेवन करत असल्याचं कळल्यानंतर एनसीबीनं बॉलीवूडकरांची केलेली तपासणी यात सिद्धांतची बहीण श्रद्धा कपूरचं देखील नाव समोर आलं होतं. पण त्यावेळी श्रद्धानं आपण ड्रग्ज सेवन करत नसल्याचं सांगत आपल्यावरील आरोपांचे खंडन केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT