Adipurush, adipurush trailer, adipurush motion poster, kriti sanon, prabhas, om raut  SAKAL
मनोरंजन

Adipurush Trailer: तो येतोय! रिलीजपुर्वीच आदिपुरुषचा ट्रेलर होतोय ट्रेंड, थिएटरमध्ये एकच जल्लोष

आदिपुरुषचा ट्रेलर उद्या ९ मेला रिलीज होणार आहे. पण रिलीजआधीच आदिपुरुषच्या ट्रेलरची हवा दिसतेय.

Devendra Jadhav

Adipurush Trailer News: गेल्या अनेक दिवसांपासून प्रभास आणि क्रिती सेनान यांच्या आदिपुरुष सिनेमाची चर्चा आहे.

आदिपुरुष सिनेमात असलेल्या प्रभू श्रीराम आणि हनुमान यांची झलक दाखवणारे मोशन पोस्टर रिलीज झाले.

आता सर्वांना उत्सुकता आहे ती म्हणजे आदिपुरुषच्या ट्रेलरची. आदिपुरुषचा ट्रेलर उद्या ९ मेला रिलीज होणार आहे. पण रिलीजआधीच आदिपुरुषच्या ट्रेलरची हवा दिसतेय.

(The trailer of om raut, prabhas, kriti senon Adipurush is trending even before its release)

उद्या आदिपुरुषच्या ट्रेलर रिलीजआधी आज थिएटरमध्ये आदिपुरुषचा ट्रेलर दाखवण्यात आला. या ट्रेलरदरम्यान एकच जल्लोष झाला. आदिपुरुषच्या ट्रेलरची सगळीकडे हवा आहे.

आदिपुरुषचा ट्रेलरची एक झलक भारतातील थिएटरमध्ये दाखवण्यात आली. या ट्रेलरमध्ये प्रभास, क्रिती सेनन आणि इतर कलाकारांची झलक दिसली. आदिपुरुषचा ट्रेलर उद्या ९ मेला सोशल मीडियावर रिलिज होणार आहे

काही दिवसांपूर्वी आदिपुरुषच्या मोशन पोस्टर मध्ये क्रिती सेनन सीतामाईंच्या भूमिकेत दिसतेय. काहीच दिवसांपूर्वी आदिपुरुषचा नवीन पोस्टर आऊट झाला होता.

यात सीतेच्या कपाळी कुंकू नसल्याने वाद झाला होता. पण आदिपुरुषच्या नवीन मोशन पोस्टरमध्ये सीताच्या भूमिकेत असलेल्या क्रिती सेननच्या कपाळी कुंकू आणि टिकली आली आहे.

प्रभासच्या आदिपुरुष या चित्रपटाची गेल्या २ वर्षांपासून चर्चा आहे. गेल्या वर्षी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता, ज्याने चांगलाच गोंधळ निर्माण केला होता.

टीझरमध्ये सैफच्या रावणाच्या लूकची खिलजीशी तुलना करण्यात आली होती. त्याचवेळी हनुमानाच्या रूपावरून वाद झाला होता.

मोस्ट अवेटेड चित्रपटांच्या यादीत आदिपुरुष टॉप वर आहे. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात प्रभासशिवाय क्रिती सेनॉन, सनी सिंग आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत. आदिपुरुषचा ट्रेलर ९ मे रोजी रिलीज होणार आहे.

ट्रेलर रिलीजसाठी मुंबईत खास कार्यक्रम होणार आहे. ट्रेलर लॉन्चची जोरदार तयारी सुरू आहे. ट्रेलर सुमारे 3 मिनिटांचा असेल. चित्रपट 16 जून रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या ड्रायव्हरने अमली पदार्थ सेवन केले होते का? पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली

एकनाथ शिंदेंच्या सर्वात जवळचे मंगेश चिवटेंच्या भावावर जीवघेणा हल्ला; भाजप नेत्यानेच सुपारी दिल्याचा दावा

Mumbai Local: मुंबईच्या रेल्वे प्रवाशांनो सावधान! लोकलच्या मार्गावर मध्यरात्रीपासूनच मेगाब्लॉक, प्रवासापूर्वी 'हे' वेळापत्रक पहाच

Latest Marathi News Live Update : रामदास कदमांच्या बायकोनं स्वत:ला का जाळून घेतलं : अनिल परब

IND vs WI 1st Test Live: वेस्ट इंडिजचे ५ फलंदाज ४६ धावांत तंबूत! Ravindra Jadeja एवढा उत्साही झाला की, अपील करताना धडामssss पडला Video Viral

SCROLL FOR NEXT