natu natu, RRR, ss rajamouli, oscars 2023, jr ntr, ram charan SAKAL
मनोरंजन

Oscar 2023: फक्त अभिमान ..! Jr. NTR आणि राम चरण नाही तर हि हॉलिवूड अभिनेत्री करणार Natu Natu वर डान्स

RRR या सिनेमाने जगभर वेगळी ओळख निर्माण केली आहे

Devendra Jadhav

RRR For Oscars 2023 News: साऊथ इंडस्ट्रीचे प्रसिद्ध दिग्दर्शक एस एस राजामौली (S S Rajamouli) यांच्या RRR या सिनेमाने जगभर वेगळी ओळख निर्माण केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटातील नाटू नाटू गाणं ऑस्करच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे सर्व भारतीयांना Natu Natu गाणं ऑस्कर जिंकणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.

(this Hollywood actress will dance on Natu Natu song in RRR at oscars 2023)

गेल्या काही दिवसांपासुन Jr. NTR आणि राम चरण ऑस्कर २०२३ मध्ये जगप्रसिद्ध झालेल्या नाटू नाटू गाण्यावर सर्वांसमोर लाईव्ह डान्स परफॉर्मन्स करणार अशी चर्चा होती.

परंतु Jr. NTR ने नुकत्याच एका मुलाखतीत तो आणि राम चरण Natu Natu गाण्यावर डान्स करणार नाही याचा खुलासा केलाय त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पण भारतीयांनी निराश होण्याची काही आवश्यकता नाही. RRR मधल्या Natu Natu गाण्यावर थेट अमेरिकन डान्सर नृत्य करणार आहे. ती म्हणजे लॉरेन गोटिलेब (Lauren Gottlieb). लॉरेन गोटिलेब हि अमेरिकन डान्सर आहे.

तिने ABCD, वेलकम टू कराची, घुमकेतू अशा हिंदी सिनेमांमध्ये अभिनय केलाय. लॉरेनने मागे हॉलिवूड असलेला फोटो शेयर करत सर्वांना हि स्पेशल बातमी सांगितली.

लॉरेनने खुलासा केला कि.. "खास बातमी!!! मी OSCARS मध्ये Naatu Naatu वर परफॉर्म करत आहे!!!!!! जगातील सर्वात प्रतिष्ठित मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मी खूप उत्साहित आहे. मला शुभेच्छा द्या!!!"

लॉरेनच्या पोस्टवर एकाने कमेंट केलीय कि, "तुझा खूप अभिमान आहे आम्हाला." अशाप्रकारे लॉरेनचा डान्स पाहण्यासाठी सर्वांना उत्सुकता आहे.

Jr. NTR म्हणाला, "मला वाटत नाही की असे काही घडेल. मी ते घडण्याची वाट पाहत होतो. पण, दुर्दैवाने, आम्हाला रिहर्सल करायला वेळ मिळाला नाही. कारण आम्हाला जगातील सर्वात मोठ्या स्टेजवर जाऊन उगाच काहीही नाचायचे नाही.

Jr. NTR पुढे म्हणाला, " आम्ही दोघेही व्यस्त होतो. कदाचित राम चरण देखील ऑस्करच्या सगळ्या गडबडीत व्यस्त होता. त्यामुळे मला नाही वाटतं आम्ही Natu Natu गाण्यावर डान्स करू.

ऑस्करमध्ये बेस्ट ओरिजनल साँग कॅटगिरीमध्ये RRR च्या नाटू नाटू ला नॉमिनेशन मिळाले आहे. ९५ व्या ऑस्कर सोहळ्यामध्ये नाटू नाटूला मिळालेलं नॉमिनेशन हे समस्त भारतीयांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT