fatima aamir 
मनोरंजन

आमिरच्या घटस्फोटानंतर 'दंगल गर्ल' फातिमा का होतेय ट्रेंड?

आमिर खान-किरण रावने घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं

स्वाती वेमूल

१५ वर्षांच्या संसारानंतर अभिनेता आमिर खान Aamir Khan आणि किरण रावने Kiran Rao घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं. २००५ साली या दोघांनी लग्न केलं. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'लगान' Lagaan या चित्रपटाच्या सेटवर या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. हळूहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. या चित्रपटासाठी किरण सहाय्यक दिग्दर्शकाचं काम करत होती. बॉलिवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्टने घटस्फोट का घेतला, या दोघांमध्ये नेमकं काय बिनसलं, असे प्रश्न चाहत्यांमध्ये उपस्थित होत आहेत. मात्र या सर्वात अभिनेत्री फातिमा सना शेख Fatima Sana Shaikh ट्विटरवर ट्रेंड होत असल्याचं पहायला मिळत आहे. फातिमाने 'दंगल' या चित्रपटात आमिरच्या मुलीची भूमिका साकारली होती. (this is why dangal girl fatima sana shaikh trending after aamir khan divorce with kiran rao)

मध्यंतरीच्या काळात आमिर आणि फातिमा यांच्यात काहीतरी शिजत असल्याची जोरदार चर्चा होती. फातिमाने आमिरच्या 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' या चित्रपटातही काम केलं होतं. या दोन्ही चित्रपटांनंतर या दोघांमध्ये जवळीक वाढल्याची चर्चा होती. मात्र फातिमाने वेळोवेळी अफेअरच्या चर्चा नाकारल्या होत्या. आता आमिरच्या घटस्फोटानंतर आता पुन्हा एकदा फातिमाची सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली आहे.

घटस्फोटाविषयी काय म्हणाले आमिर-किरण?

'विभक्त होण्याची प्रक्रिया काही दिवसांपूर्वीच सुरू झाली होती आणि आता आम्ही दोघं वेगवेगळे राहत आहोत. मुलगा आझादचं संगोपन आम्ही दोघं मिळून करणार आहोत. त्याचप्रमाणे आम्ही चित्रपट, पानी फाऊंडेशन आणि इतर प्रोजेक्ट्सवर सोबत काम करणार आहोत. कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींचे खूप आभार, कारण त्यांनी या निर्णयात आमची साथ दिली आणि आम्हाला समजून घेतलं. आमच्या हितचिंतकांनीही शुभेच्छा आणि आशीर्वाद आम्हाला द्याव्यात. घटस्फोट म्हणजे शेवट नसून एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे', असं स्पष्ट केलं.

२०११ साली किरणने सरोगसीच्या आधारे मुलाला जन्म दिला. या दोघांना नऊ वर्षांचा आझाद हा मुलगा आहे. त्याआधी आमिरने १९८६ मध्ये अभिनेत्री रिना दत्ताशी लग्न केलं होतं. या दोघांना जुनैद हा मुलगा आणि आयरा ही मुलगी आहे. २००२ साली या दोघांनी घटस्फोट घेतला आणि त्यानंतर दोन्ही मुलांचा ताबा रिना दत्ताला मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT