Tiger 3 Trailer Release Salman Khan And Katrina Kaif Yrf Yash Chopra Viral Vnp98 Esakal
मनोरंजन

Tiger 3 Trailer Out: ‘आतिशबाजी तुमने शुरू की खत्म मैं करूंगा…!’ टायगरचं नाव घ्यायचं नसतं..

Vaishali Patil

Tiger 3 Trailer  Out : गेल्या काही दिवासांपासून बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि कतरिना कैफच्या टायगर 3 च्या ट्रेलरची प्रेक्षकांना प्रतिक्षा लागून होती. कालपासूनच सोशल मीडियावर टायगर 3 ट्रेलर ट्रेंड होत होता.

टायगर 3 मधून सलमान खान आणि कतरिना कैफची जोडी अनेक वर्षांनंतर थिएटरमध्ये परतत आहे. या दोघांनी आतापर्यंत 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' असे दोन बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. आता त्याचे चाहते 'टायगर 3' पडद्यावर येण्याची वाट पाहत आहे. आता प्रेक्षकांना ज्या क्षणाची प्रतिक्षा आता संपली आहे. निर्मात्यांनी या टायगर 3 चा ट्रेलर रिलिज केला आहे.

सलमान खानच्या मोस्ट अवेटेड चित्रपटाचा ट्रेलर 16 ऑक्टोबरला रिलिज करण्यात आला. काही दिवसांपुर्वी या चित्रपटाचा टिझर रिलिज करण्यात आला होता. जो पाहिल्यानंतर टायगरवर गद्दार असल्याचा शिक्का का बसला आणि आता तो देशद्रोही आहे की देशभक्त असे अनेक प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडले होते.

आता यातील काही प्रश्नाची उत्तर या ट्रेलरमध्ये मिळत आहे. टिझरमध्ये फक्त भाईजान सलमानचाच लूक रिव्हिल करण्यात आला होता मात्र आता ट्रेलरमध्ये सलमान खानसोबतच कतरिनाही धमाकेदार अ‍ॅक्शन करताना दिसत आहे. तर यावेळी इमरान हाश्मी प्रेक्षकांना व्हिलनच्या रुपात पहायला मिळाला आहे.

काही वेळातच हा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता सलमान खानला मोठ्या पडद्यावर पूर्ण अॅक्शन अवतारात पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत. सोशल मिडियावर फक्त सलमान आणि टायगर 3 चीच हवा आहे.

टायगर 3 मध्ये सलमान खान, कतरिना कैफ शिवाय इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय शाहरुख खान सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहेत ज्यात ज्यूनियर एनटीआरच्या नावाची चर्चा आहे.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

Bigg Boss Marathi 6 Live Update: महाराष्ट्राची धक्का गर्ल प्राजक्ता शुक्रेची 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात एंट्री

सोशल मीडिया स्टार करण सोनवणेची बिग बॉस मराठी 6 मध्ये धमाकेदार एंट्री, सोनवणे वहिनी घरात राडा घालणार?

Bigg Boss Marathi 6 : बॅकग्राऊंड डान्सर म्हणून स्ट्रगल, मालिकांमधून प्रसिद्धी आता बिग बॉसमध्ये राडा करायला आला आयुष संजीव !

BBM 6 UPDATE:'लक्ष्मीनिवास' फेम अभिनेत्रीची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री; प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का

SCROLL FOR NEXT