After breakup with disha is tiger in love with shaddha kapoor?  esakal
मनोरंजन

हे काय बोलून गेला टायगर? दिशासोबत ब्रेकअप नंतर आता श्रद्धा कपूर...

दिशासोबत ब्रेकअपनंतर आता टायगर श्रद्धाच्या प्रेमात ?

सकाळ डिजिटल टीम

टायगर श्रॉफ करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या बहुचर्चित शोमध्ये झळकणार आहे. करण जोहरच्या या शो मध्ये सेलिब्रिटींचे अनेक सिक्रेट्स बाहेर पडत चर्चेत येत असतात. आलिया ते रणबीर आणि सारा ते अनन्या अशा अनेक सेलिब्रिटींचे सिक्रेट्स याच शोमध्ये बाहेर पडलेत. आता दिशा नंतर टायगरच्या आयुष्यात श्रद्धाची एन्ट्री होते की काय अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये चालली आहे. खरं तर या शो मधल्या टायगरच्या एका वक्तव्यानेच टायगर आणि श्रद्धाच्या चर्चांना उधाण आलंय. (After breakup with disha is tiger in love with shaddha kapoor?)

करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये टायगरने करण सोबतच्या चर्चांमध्ये असे काही म्हटले की त्यानंतर टायगर आणि श्रद्धा यांच्या चर्चांची सोशल मीडियावर चांगलेचीच चर्चा रंगली. दिशा आणि टायगरचं नुकतंच ब्रेक झालं असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. आणि टायगरने कॉफी विथ करण या शो मध्ये दिशा सोबत त्याचं ब्रेकअप झालं असल्याचंही स्पष्टच सांगितलं.

मात्र यावेळी टायगरला श्रद्धा कपूर आवडते या गोष्टीचाही त्याने खुलासा केला. त्याला तिच्यात वेगळाच अट्रॅक्टिव्हनेस दिसत असल्याचेही तो म्हणाला. अर्थात आता दिशासोबत ब्रेकअपनंतर टायगर श्रद्धा कपूरमध्ये प्रेम शोधत तर नाही ना? असा प्रश्न अनेकांना पडलाय.

'मी सध्या सिंगल आहे. मी कोणाच्यातरी शोधात आहे असं मला कायम वाटत असतं', असंही तो म्हणाला. टायगर इथेच थांबला नाही. 'मला आधीपासूनच श्रद्धा आवडत होती असंही तो यावेळी म्हणाला. श्रद्धा डॅशिंग दिसते.' असं तो म्हणाला. श्रद्धाचं टायगरच्या तोंडून एवढं कौतुक ऐकून चाहत्यांच्या चर्चेला उधाण आलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSMT Protest: रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन; मुंबई लोकलची सेवा विस्कळीत, ट्रेन तब्बल १ तास उशीराने, संपूर्ण प्रकरण काय?

Earn Lakhs Without Job : नोकरी न करताही तुम्ही मिळवू शकता लाखोंचं पॅकेज!, फक्त पास करा एक परीक्षा

Suryakumar Yadav: 'मी अन् गौती भाई एकाच पानावर...', ऑस्ट्रेलियाला चौथ्या T20I मध्ये पराभूत केल्यानंतर नेमकं काय म्हणाला सूर्या?

Ajit Pawar on Parth Pawar land deal case : पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात अखेर अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...

Latest Marathi Live Update News : ठुबे वस्ती येथे बस थांबा असूनही बस थांबत नाही; विद्यार्थी, प्रवाशांची गैरसोय!

SCROLL FOR NEXT