Tiku Weds Sheru Trailer Out cast Nawazuddin Siddiqui & Avneet Kaur Producer Kangana Ranaut  sakal
मनोरंजन

Tiku Weds Sheru: कंगनाची निर्मिती अन् नवाजचा दमदार अभिनय.. ट्रेलर पाहून पब्लिक खुश..

'टिकू वेड्स शेरु'चा ट्रेलर रिलीज.. नवाजंन आणि अवनीत कौर यांची जबरदस्त केमिस्ट्री..

नीलेश अडसूळ

Tiku Weds Sheru: गेली काही दिवस कंगना रनौतची निर्मिती असलेल्या ‘टीकू वेड्स शेरू’ या सिनेमाची बरीच चर्चा होती. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. अखेर, या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

हा चित्रपट कंगना साठी आणि मनोरंजन विश्वासाठी देखील अत्यंत महत्वाचा मानला गेला कारण निर्माती म्हणून ही कंगनाची पहिली निर्मिती आहे. आता अभिनयासोबतच ती निर्मातीही झाली आहे. त्यामुळे हा सिनेमा काय वेगळा विषय घेऊन येणार याची उत्सुकता होती.

या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकीला अवनीत कौर प्रमुख भूमिकेत आहेत. नवाजच्या नावाने या चित्रपटाची अधिकच चर्चा रंगली. अखेर 'टीकू वेड्स शेरू'चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

(Tiku Weds Sheru Trailer Out cast Nawazuddin Siddiqui & Avneet Kaur Producer Kangana Ranaut )

या सिनेमातून एक आगळी वेगळी लव्ह स्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चाळीशीतला नवाज आणि विशीतली अवनीत यांची भन्नाट केमिस्ट्री रंगलेली दिसते. विशेष म्हणजे नवाजने नेहमीप्रमाणेच आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. अभिनेत्री अवनीत कौरचा हा पहिलाच सिनेमा असला तरी तिचा अभिनय आपले लक्ष वेधून घेतो.

‘टीकू वेड्स शेरू’या सिनेमाची कथा टीकू आणि शेरू यांच्या अजब-गजब लव्हस्टोरीची आहे. यामध्ये टीकूचं पात्र अवनीत कौर आणि शेरूचं पात्र नवाजुद्दीन सिद्दीकीनं (nawazuddin siddiqui) साकारलं आहे. शेरू मुंबईतील एक साधा ज्यूनिअर आर्टिस्ट असतो जो स्वत:ला सुपरस्टार समजतो.

तर शेरूच्या लग्नासाठी मुलगी बघितली जाते तीही अभिनेत्री होण्याचं स्वप्न पाहत असते. ती म्हणजे टिकू आणि केवळ मुंबईला जाण्यासाठी टीकू शेरूसोबत लग्न करण्यासाठी तयार होते. पुढे मुंबईत आल्यानंतर आपलं अभिनेत्री होण्याचं स्नप्न पूर्ण करण्यासाठी ती घरातून पळून जाते. आता पुढे नेमकं काय होतं, तेच आपल्याला चित्रपटात दिसणार आहे.

हा चित्रपट मोठ्या पडद्यावर नाही तर तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. येत्या 23 जून रोजी प्राइम व्हिडीओवर तो प्रदर्शित होणार आहे. बॉलिवूडची क्विन आणि बिनधास्त अभिनेत्री कंगना रनौतने या सिनेमची निर्मिती केली आहे. त्यामुळे या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहण्यासारखं असेल.(Kangana Ranaut)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT