TMC Studen Union revealed a truth behind kk's death today esakal
मनोरंजन

केकेच्या निधनानंतर TMC विद्यार्थी संघटनेने केला मोठा खुलासा,म्हणाले..

संघटनेने दिलेल्या माहितीनुसार केकेने शोदरम्यान आरोग्याबाबत कुठलीही तक्रार केली नव्हती.

सकाळ ऑनलाईन टीम

कोलकाता येथील 'नझरूल मंच' येथे कार्यक्रम केल्यानंतर लगेचच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने प्रसिद्ध गायक केकेचे निधन झाले.(KK)त्याच्या मृत्यूच्या काही तासांनंतर असा दावा करण्यात आला होता की, हॉल प्रेक्षकांच्या गर्दीने क्षमतेपेक्षा जास्त भरल्या गेला होता.केकेने शोदरम्यान त्याला जाणवणाऱ्या उष्णता आणि आर्द्रतेची तक्रारही केली होती.

३१मे रोजी हा शो 'ब्लॅक आयड इव्हेंट्स हाऊस' नावाच्या कोलकाता स्थित इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने आयोजित केला होता.(Live Concert) अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस - अखिल भारतीय तृणमूल छात्र परिषद या विद्यार्थी संघटनेद्वारे गुरुदास महाविद्यालयाच्या विद्यार्थी संघटनेच्या वतीने हे आयोजन करण्यात आले होते.याच इव्हेंट मॅनेजिंग कंपनीने ३०मे रोजी विवेकानंद कॉलेजसाठी कॉलेज फेस्ट आयोजित केला होता, जिथे केकेने त्याच ठिकाणी परफॉर्म केले होते.

शोसाठीचे सगळे प्रोटोकॉल पाळण्यात आले होते,तरी..

गुरुदास कॉलेजच्या विद्यार्थी संघटनेच्या उपाध्यक्षा सुमन होरे यांनी सांगितले की त्यांनी मंगळवारी कार्यक्रम आयोजित करताना सर्व आवश्यक प्रोटोकॉलचे पालन केले होते.“आम्ही आमच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाच पास वितरित केले.(Singer) आम्ही सर्व प्रोटोकॉल पाळले.आम्ही कोलकाता पोलिसांची परवानगी घेतली. कार्यक्रमाला ३०-३५ बाउन्सर, पोलिस आणि एक रुग्णवाहिका उपस्थित होती,” असेही या संघटनेकडून सांगण्यात आले.तसेच 'केकेने शो दरम्यान कोणत्याही आरोग्याच्या समस्येची तक्रार केली नाही.'असेही ते म्हणाले.

एवढेच नव्हे तर ते पुढे म्हणाले, “आम्ही आमच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ३,५०० पास दिल्या होत्या.मात्र हा शो पाहण्यासाठी किमान ५ हजार लोक आले होते. ते कुठून आले हे आम्हाला माहीत नाही. त्यांनी प्रवेश मिळवण्यासाठी भिंत ओलांडली. आमच्या स्वयंसेवकांनी गर्दी रोखण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य झाले नाही.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: जोरदार पावसातही लोकल सुसाट धावणार, रेल्वेचा खोळंबा टळणार; प्रशासनाने उचलले मोठे पाऊल

बाबो! बॉबी देओल एकावेळी प्यायचा २० ग्लास दूध, सनी देओलच्या आहाराबद्दल म्हणाला, 'त्याला लस्सी किंवा दूध...'

TVS Bike : फक्त 47 हजार किंमत; 30 दिवसांत 42,246 लोकांनी खरेदी केली 'ही' टू व्हीलर गाडी, 58 कि.मी. स्पीड

काम तर करायची नाहीच उलट... सुप्रिया पाठारेंना कामवालीचा आलेला असा अनुभव की त्यांनी हातच जोडले; म्हणाल्या-

Latest Marathi News Update : आजपासून मुंबई टी२० लीगला सुरूवात; वानखेडे स्टेडियमवर रंगणार ३० सामने

SCROLL FOR NEXT