TMKOC Monika Bhaduria interview Babita fame  esakal
मनोरंजन

TMKOC Monika Bhadoriya : 'तारक मेहताच्या बबिताला पण...,' असित मोदींवर मोनिकाचा सणसणीत आरोप

तारक मेहतामध्ये मिसेस सोढीची भूमिका करणारी जेनिफर मिस्त्री नावाच्या अभिनेत्रीनं असित मोदींसह आणखी तीन जणांवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे.

युगंधर ताजणे

TMKOC Monika Bhadauria reveals Munmun Dutta also left show : टीव्ही मनोरंजन विश्वात गेल्या दीड दशकांहून अधिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या तारक मेहता का उल्टा चष्माची गोष्टच वेगळी आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळालेली तारक मेहताचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून तारक मेहता ही मालिका आणि त्या मालिकेचे निर्माते असित मोदी चर्चेत आले आहे.

तारक मेहताच्या निर्मात्यांवर त्याच मालिकेतील अभिनेत्रींनी असित मोदींवर लैंगिक छळाचे आऱोप करण्यात आले आहे. त्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तारक मेहतामध्ये मिसेस सोढीची भूमिका करणारी जेनिफर मिस्त्री नावाच्या अभिनेत्रीनं असित मोदींसह आणखी तीन जणांवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर तिला पाठींबा देण्यासाठी अनेक कलाकार पुढे आले आहेत. बावरीची भूमिका करणारी मोनिका भदोरिया आणि प्रियंका अहुजानं देखील काही गंभीर आरोप केले आहेत.

Also Read - Silicon Bank दिवाळखोरीः भारतावर नाही होणार दीर्घकालिन परिणाम...का ते वाचा!

मोनिका भदोरियानं दावा केला आहे की, बबिता फेम मुनमुन दत्तासोबत देखील सेटवर अश्लील वर्तन केले जात होते. तिनं काही कारणास्तव ही गोष्ट सांगितली नसेल. मात्र त्यामुळे तिनं तारक मेहता शो सोडण्याचा विचार केला होता. असा धक्कादायक खुलासा मोनिकानं केला आहे. त्यामुळे आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. बबितानं भलेही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला असेल पण तिला दरवेळी परत बोलावण्यात आले. असे मोनिकानं म्हटले आहे.

सेटवर मुनमुन दत्त आणि असित मोदी यांचे काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. त्यानंतर मुनमुननं तो शो सोडण्याचा निर्णय घेतला होता. अशा बातम्या समोर आल्या होत्या. यावर मोनिकानं म्हटले आहे की, मोनिकाला देखील त्या शोमध्ये मानसिक आणि शाररिक त्रास होत होता. न्युज १८ ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मोनिकानं म्हटले आहे की, मुनमुननं शो सोडला नाही. पण तिला सतत त्रास दिला जात आहे. त्यामुळे की काय ती बऱ्याच दिवसांपासून सेटवर देखील आलेली नाही.

मोदींचे वागणे हे अनेकांना खटकत असल्यानं अनेकांनी ती मालिका सोडली आहे. असा धक्कादायक खुलासा मोनिकानं केला आहे. मोनिकानं आपण मालिका सोडणार असल्याचे सांगत असित मोदींवर आरोप केले आहेत. मी २०१९ मध्ये ती मालिका सोडली. पण मला तीन महिने पैशांसाठी खूप त्रास देण्यात आला. माझ्या आईचं निधन झालं, तेव्हा सात दिवसांतच मला सेटवर बोलवून घेण्यात आले. तुला कामासाठी पैसे दिले जातात. आम्हाला वाटेल तेव्हा तुला बोलवणार असे मला सांगण्यात आले होते. असा खुलासा मोनिकानं या मुलाखतीमध्ये केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT