Tollywood Actor Kamal Haasan gift to Surya  esakal
मनोरंजन

Kamal Haasan Gifts Rolex to Suriya: 47 लाखांचं रोलेक्स घड्याळ खास तुझ्यासाठी!

टॉलीवूडमधील अभिनेत्यांची गोष्टच काही वेगळी असल्याचे दिसून आले आहे.

युगंधर ताजणे

Kamal Haasan Gifts Rolex to Suriya: टॉलीवूडमधील अभिनेत्यांची गोष्टच काही वेगळी असल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून बॉलीवूडच्या चित्रपटांना मागे सारून स्वताच्या नावाचा वेगळा ठसा या चित्रपटांनी उमटविला आहे. त्यामध्ये अल्लु अर्जुनच्या पुष्पाचा, राजामौली यांच्या आरआरआर आणि यशच्या केजीएफ 2 यांच्याविषयी सांगावे लागेल. सध्या बॉक्स ऑफिसवर कमल (Kamal Haasan) हासन यांचा विक्रम प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला बॉक्स (Box Office) ऑफिसवर प्रचंड यश मिळाले आहे. तीन दिवसांत शंभर कोटींपेक्षा अधिक कमाई कमल हासन यांच्या चित्रपटानं केली आहे. त्यामध्ये विजय सेतूपती, फवाद फाजिल (Tollywood movies) अभिनेत्यांचाही समावेश आहे. यासगळयात चर्चा रंगली आहे ती सुर्या या अभिनेत्याची त्यानं विक्रममध्ये काही मिनिटांची एक भूमिका केली आहे. ती प्रेक्षकांना कमालीची भावली आहे.

सुर्यानं या चित्रपटासाठी केवळ एक रुपया मानधन घेतल्याची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यावेळी आपण ही भूमिका फक्त कमल हासन यांच्या प्रेम आणि आदरापोटी केल्याचे सांगितले. मात्र कमल हासन यांनी सुर्याच्या या प्रेमाची जाण ठेवत त्याला एक मोठं गिफ्ट दिलं आहे. ते गिफ्ट साधं नसून रोलेक्सचं घड्याळ आहे. त्याची किंमत 47 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. कमल हासन यांचे आपल्या आवडत्या अभिनेत्याच्याप्रती असलेलं प्रेम पाहून नेटकऱ्यांनी देखील त्या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. विक्रममध्ये साकारलेल्या त्या भूमिकेसाठी कमल हासन यांनी सुर्याला हे महागडे गिफ्ट दिल्याचे सांगितले आहे.

हाती आलेल्या नव्या माहितीनुसार विक्रमनं दोनशे कोटींचा टप्पा पार केला आहे. दिग्दर्शक लोकेश कनगराज यांच्या विक्रमला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. या चित्रपटापुढे अक्षय कुमारचा सम्राट पृथ्वीराज फिका पडल्याचे दिसून आले आहे. सुर्यानं विक्रमध्ये एका ड्रॅग्ज माफियाची भूमिका केली आहे. सुर्यानं सोशल मीडियावर ट्विट करुन एक खास गोष्ट चाहत्यांना सांगितली आहे. ती म्हणजे आपल्याला कमल हासन यांनी रोलेक्सचं घड्याळ गिफ्ट म्हणून दिलं आहे. अन्ना तुमच्या या खास भेटीसाठी मी आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो. असे सुर्यानं म्हटले आहे. याशिवाय सुर्यानं यावेळी तीन फोटो देखील शेयर केले आहे. आता एक नवी बातमी समोर आली आहे की, विक्रमच्या पुढील भागात सुर्याला मोठी भूमिका मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

कमल हासन यांचा विक्रम हा चित्रपट पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. यापूर्वी त्यांनी विक्रमचे दिग्दर्शक लोकेश कनगराज यांना महागडी कार भेट दिली होती. आतापर्यत विक्रमनं कमाईचे वेगवेगळे विक्रम आपल्या नावावर करण्याचा सपाटा चालवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Andekar Gang: कशी सुरू झाली आंदेकर टोळीची दहशत? भांड्याचा व्यवसाय ते अंडरवर्ल्ड कनेक्शन! ४ पिढ्यांचा पडद्यामागचा काळा इतिहास

Mill Workers: गिरणी कामगार पुन्हा आक्रमक, हक्काच्या घरासाठी आंदोलन छेडणार

WhatsApp Services : नेट स्लो नाहीतर, व्हॉट्सअ‍ॅप डाऊन...! स्क्रोलिंग करताना अडचण येतीय? मग 'ही' ट्रीक वापरा

Latest Marathi News Updates:विसर्जन मिरवणुकीदरम्यान नाचण्यावरुन वाद, एका तरुणाचा खून

3D Photo Prompt : फ्रीमध्ये तुमचे '3D स्टाईल' (थ्री डी) फोटो बनवा, एका क्लिकवर..

SCROLL FOR NEXT