Samantha got few hindi film offers but she couldn't do it because hindi language
Samantha got few hindi film offers but she couldn't do it because hindi language esakal
मनोरंजन

HBD SAMANTHA:या कारणाने समंथाने हिंदी चित्रपटांत काम करणे टाळले होते..

सकाळ डिजिटल टीम

टॉलीवूडमधे स्वत:च्या अभिनयातून सर्वांना भूरळ पाडणारी अभिनेत्री समंथा हीला हिंदी दिग्दर्शकांकडून हिंदी चित्रपटासाठी बरेच ऑफर आले पण या अभिनेत्रीने मात्र तीथे काम करण्यास नाकारले.आज समंथाचा ३५ वा वाढदिवस आहे.तीच्या वाढदिवसानिमित्त तीच्या चित्रपटातील कारकिर्दीचा प्रवास आणि तीच्या हिंदी चित्रपटात न येण्याचं कारण जाणून घेऊया.

समंथा रूथ प्रभूची गणना साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्रींमधे केली जाते.समंथाने तीच्या अभिनयाने तीची वेगळी ओळख निर्माण केली आहे.केरळ मधे जन्मलेल्या या अभिनेत्रीचे शिक्षण चेन्नईमधे पूर्ण झाले आहे.२०१० मधे समंथाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.त्यानंतर तीने अनेक तमीळ आणि तेलगु चित्रपटांत काम केले.त्यामुळे हिंदी भाषेत काम करणे समंथासाठी अवघड होते.समंथाला हिंदी चित्रपटासाठी अनेक ऑफर्स आलेत.पण होकार देऊनही जेव्ही समंथाला हिंदी भाषेत काम करणे अवघड गेले तेव्हा तीने हिंदी चित्रपटांत काम करण्यास नकार दिला.एका मुलाखतीत बोलताना समंथाने आणखी एक खुलासा केलाय.तीला हिंदी चित्रपटसृष्टीची भिती वाटते असे ती म्हणाली.तसेच भाषेत येणाऱ्या अडचणींमुळेही समंथा हिंदी चित्रपटांकडे वळली नाही.

समंथाचा साऊथ चित्रपटांतील प्रवास बघितला तर समंथाला चार फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले आहेत.तसेच समंथाला 'ये माया चेसावे' या तीच्या पहिल्या चित्रपटासाठी बेस्ट डेब्यू अॅक्ट्रेसचा अवॉर्ड मिळाला आहे.मागल्या वर्षी समंथाने तीच्या 'द फॅमिली मॅन 2' या वेब सिरीजमधे तीने तीच्या निगेटीव्ह रोलमधून सगळ्यांना हैराण करून सोडले होते.

मागल्या वर्षी समंथाचा आणि नागा चैतन्य यांचा घटटस्फोट झाला.हे दोघे चार वर्ष सोबत होते.तसेच यांचे लग्न शाही पद्धतीने झाले होते.यांचा लग्नाला १० करोड खर्च झाले होते.त्यांच्या घटस्फोटाची बातमी चाहत्यांना हैराण करणारी होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT