मनोरंजन

प्रसिद्ध कोरिओग्राफर शिवा शंकर यांचे निधन

बॉलीवूड, टॉलीवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर शिवा शंकर यांचे निधन झाले आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - बॉलीवूड, टॉलीवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर शिवा शंकर यांचे निधन झाले आहे. ते 72 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनानं संक्रमित झाले होते. त्या आजारावर उपचार घेत असताना त्यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. शिवा शंकर यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेक दिग्गज सेलिब्रेटींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेता सोनु सूदनं आपल्या व्टिटरवरुन शिवा यांना आदरांजली वाहताना त्यांच्या कुटूंबियांप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे. याशिवाय त्यांना आर्थिक मदत करण्याचे आश्वासनही दिले आहे.

प्रख्यात निर्माता आणि दिग्दर्शक एस एस राजामौली यांनी देखील शिवा शंकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनानं त्रस्त असलेल्या शिवा शंकर यांना हैद्राबाद मधील एका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना उपचारासाठी पैसे नसल्याची बाब समोर आली होती. याप्रसंगी सोनु सूदनं त्यांना मदतीचा हात दिला होता. आर्थिक संकटात असल्यानं शंकर यांना उपचारासाठी त्रास सहन करावा लागला होता. याबाबत सुत्रांनी सोशल मीडियावरुन माहिती दिली होती. शिवा शंकर यांना कोरोना झाल्यानंतर त्यांच्या दोन्ही मुलांना देखील कोरोना झाला होता.

शिवा शंकर यांच्या प्रकृतीत अधिक बिघाड झाल्यानं त्यांना आयसीयुमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. काल त्यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला. शिवा शंकर यांच्या जाण्यानं साऊथ फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. सोनुनं आपल्या व्टिटमध्ये लिहिलं आहे की, मास्टर शिवा शंकर यांच्या निधनाचे वृत्त ऐकताच खूप वाईट वाटले. त्यांना वाचविण्यासाठी आम्ही शक्य तेवढे प्रयत्न केले. मात्र ते जमलं नाही. मास्टरजी हे त्यांच्या आठवणीतून आमच्या नेहमीच लक्षात राहतील. देव त्यांच्या परिवाराला या दु;खातून सावरण्याची ताकद देवो.. अशा शब्दांत त्यानं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. शिवा शंकर हे प्रसिद्ध कोरिओग्राफर होते. त्यांनी मगधीरामधील प्रसिद्ध गाणं धीरा धीरा गाण्याचे कोरिओग्राफ केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI BR Gavai यांच्या कार्यकाळात सर्वोच्च न्यायालयात १० दलित न्यायाधीशांची नियुक्ती, ओबीसी कीती?

Jalna News: जालना हादरलं! दुचाकी वादातून तरुणाची मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू

Dharashiv Accident: धाराशिवमधील अपघातात तिघे ठार; मोटारीचा टायर फुटून अपघात, ११ जण जखमी

Parliament Winter Session 2025 : संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबर पासून, सरकार अणू उर्जासह १० मोठी विधेयके मंजूर करण्याच्या तयारीत

आजचे राशिभविष्य - 23 नोव्हेंबर 2025

SCROLL FOR NEXT