Fact Check did Rashmika and Vijay Deverakonda secretly get married know inside details Google
मनोरंजन

Fact Check: रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडानं गुपचूप उरकलं लग्न?, व्हायरल फोटोनं चर्चेला उधाण

विजय देवरकोंडा आणि रश्मिकाला अनेकदा एकत्र स्पॉट केलं गेलंय, गेल्या काही दिवसांत त्याच्या अफेअरच्या बातम्यांनीही जोर धरला होता.

प्रणाली मोरे

Rashmika Mandana: रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा नेहमीच चर्चेत पहायला मिळतात. त्यांचे चाहते तर त्यांना एकत्र पाहून भलतेच खुश असतात. रश्मिका आणि विजयला अनेकदा मुंबईतही एकत्र स्पॉट केलं गेलं होतं. आणि त्यामुळे लोकांना त्यांच्यात काहीतरी सुरू आहे याची शंका देखील आली होती.

काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल झालेला पहायला मिळाला,ज्यानंतर चर्चा सुरु झाली ती विजय आणि रश्मिकाच्या गुपचूप लग्नाची.

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी नेहमीच आपल्या रोमान्सच्या बातम्यांवर बोलणं टाळलं आणि कधी बालले तरी त्यांनी याला नकारच दिला. पण आता या व्हायरल फोटोमध्ये मात्र ते लग्न झालेल्या नवविवाहित जोडप्याच्या पेहरावात दिसत आहेत. चला जाणून घेऊया त्या व्हायरल फोटोविषयी.(Fact Check did Rashmika and Vijay Deverakonda secretly get married know inside details)

चाहत्यांना विजय आणि रश्मिकामधील केमिस्ट्री नेहमीच भुरळ घालत आली आहे. दोघांच्या लग्नाचे मॉर्फ्ड फोटो जे व्हायरल झालेयत त्यांनी तर आगीत तूप ओतायचं काम केलं आहे. एकतर आधीच दोघांविषयी लोकांना शंका आहे त्यात असे काहीतरी फोटो समोर आल्यावर दुप्पट वेगानं चर्चा सुरु झाली.

एका चाहत्यानं फोटोशॉपच्या माध्यमातून त्यांना नवविवाहित जोडप्याच्या रुपात दाखवलं आहे. ज्यामध्ये रश्मिकाने नव्या नवरीचा पेहराव केला आहे. ज्यात हातात लग्नाचा चूडा,लहंगा तिनं घातला आहे. तर विजय देवरकोंडाने देखील आयवरी रंगाची शेरवानी घातली आहे. व्हायरल फोटोंना नेटकऱ्यांचे खूप प्रेम मिळताना दिसत आहे, आणि आता विजय आणि रश्मिकानं प्रेमाला अधिकृत करत लवकर लग्नबंधनात अडकावं याची इच्छा मनाशी धरत प्रत्येकजण याची वाट पाहत आहेत.

विजय देवरकोंडा करण जोहरच्या टॉक शो मध्ये आला होता तेव्हा त्यानं याविषयी भाष्य केलं होतं. करणनं विजयला त्याच्या लव्ह लाईफविषयी विचारले होते. करणनं विजयला रश्मिकासोबतच्या त्याच्या कथित अफेअरविषयी थेट सवाल केला होता. तेव्हा विजय म्हणाला होता,''मी माझ्या करिअरच्या सुरुवातीला तिच्यासोबत दोन सिनेमे केले. ती खूप गोड आहे,आणि माझं तिच्यावर प्रेम आहे. कारण ती माझी खूप चांगली मैत्रिण आहे''.

हेही वाचा: गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

विजय पुढे म्हणाला,'' सिनेमाच्या माध्यमातून आपण खूप वेगवेगळ्या गोष्टी लोकांना दाखवतो. नात्यातले अनेक बंध कधीकधी एकाच सिनेमात दाखवावे लागतात. त्यामुळे अर्थातच त्या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांमध्ये एक बंध निर्माण होतो. तसं पाहिलं तर मला एखाद्या मुलीच्या डोळ्यात डोळे घालून बोलायला देखील थोडा वेळ लागतो. मी पटकन सहज होत नाही''.

एका वेबसाईटच्या रिपोर्टनुसार समोर आलं होतं की विजय आणि रश्मिकानं काही वर्षांपूर्वी ब्रेकअप केलं होतं,पण म्हणे 'लाइगर' सिनेमाला अपयश मिळाल्यानं विजय थोडासा नाराज झाला अन् त्यानंतर रश्मिकानं एक मैत्रिण म्हणून त्याला सावरलं आणि ते पुन्हा एकत्र आलेयत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BDCC Bank : बीडीसीसी बँकेसमोर काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांत तुफान हाणामारी; सचिवाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा BJP चा आरोप

India vs Pakistan Asia Cup 2025 : सरकारच्या आदेशानुसार भारत-पाकिस्तान सामना, नियमांचं पालन करणार; अरुण धुमल यांचं स्पष्टीकरण, नेमकं काय म्हणाले?

Explained: सकाळच्या नाश्त्यात 'हे' 5 पदार्थ खाऊ नका, आरोग्याच्या वाढू शकतात समस्या

Latest Marathi News Updates : नऊ दिवस बंद ठेवलेला करूळ घाटमार्ग आज दहाव्या दिवशी वाहतुकीस खुला

श्रीदेवीने नवऱ्यासोबत रूम शेअर करण्यास दिलेला नकार, कारण ऐकून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT