South Cinema news
South Cinema news  esakal
मनोरंजन

South Cinema: ऑगस्टपासून 'प्रभास - महेश बाबूच्या' चित्रपटांना 'ब्रेक'! कारण...

युगंधर ताजणे

Tollywood Movie news: भलेही टॉलीवूडच्या चित्रपटांनी बॉलीवूडच्या नाकीनऊ आणले असतील, मात्र आता टॉलीवूड चित्रपट, चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यांची डोकेदुखी चांगलीच वाढणार आहे. त्याचा परिणाम प्रामुख्यानं टॉलीवूडमधील (South Cinema News) प्रसिद्ध अभिनेते प्रभास आणि महेश बाबुच्या चित्रपटांवर होणार आहे. ऑगस्टपासून तेलूगु चित्रपटांच्या शुटींगसाठी काही मर्यादा आल्या आहेत. यामुळे निर्माते, अभिनेते अडचणीत आले आहे. त्याचे झाले असे की, (Mahesh Babu And Prabhas) प्रॉड्युसर्स गिल्डच्या वतीनं मंगळवारी एक पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे.

टॉलीवूडमधील बहुतांशी चित्रपटांचे शुटींग हे येत्या ऑगस्टपासून सुरु होणार होते. त्यात प्रभास आणि महेश बाबुच्या चित्रपटांचा समावेश आहे. मात्र ते शुटींग आता (Entertainment News) होणार नाही. जोपर्यत चित्रपटांचे निर्माते आपआपसांतील वाद मिटवत नाहीत तोपर्यत या चित्रपटांची शुटींग सुरु होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचे दुसरे कारण असे की, आरआरआर, केजीएफ2, विक्रम वगळता आणि काही चित्रपटांना मिळालेला प्रतिसाद हा कमी असल्यानं आता निर्मात्यांनी धोरणात्मक निर्णय घेणं गरजेचं आहे. त्यामुळे एका बैठकीचे आयोजनही करण्यात आले आहे. मात्र अजुन त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही.

Tollywood producers letter

चित्रपटांच्या परफॉर्मन्समुळे प्रॉड्युसर्स गिल्ड चिंतेत आहे. त्यांना काय करावे, यातू कसा मार्ग काढावा असा प्रश्न पडला आहे. याशिवाय ओटीटीवर निर्णय घेणे, चित्रपटांचे बजेट, यावरही निर्णय घेणे अपेक्षित आहे. त्यामुळे काही चित्रिकरण स्थगित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

सोशल मीडियावर देखील गिल्डच्यावतीनं एक पत्र व्हायरल करण्यात आले आहे. त्या पत्रात सतत बदलणारा रेव्हेन्यु आणि किंमत यावर विचार केला गेला आहे. यासगळ्यावर जोपर्यत ठाम निर्णय होत नाही तोपर्यत कोणत्याही चित्रपटांचे शुटिंग होणार नाही. पोस्ट कोव्हिडनंतर मनोरंजन विश्वातील परिस्थिती वेगानं बदलली आहे. त्याचा परिणाम अनेक गोष्टींवरही झाला आहे. त्यामुळे आता वेळ आली आहे निर्णयात्मक धोरणाची. असा उल्लेख त्या पत्रात करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

राज्यातील चार शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर; कधी होणार मतदान?

Latest Marathi News Live Update : 'अशा बिनकामाच्या गोष्टींवर मोदी नक्कीच बोलतील..'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्याबाबत प्रियांका गांधींची प्रतिक्रिया

Game Of Thrones : लॅनिस्टर गादीचा वारस हरपला.. 'गेम ऑफ थ्रोन्स' मधील 'या' कलाकाराचं निधन; पार्टनरची पोस्ट चर्चेत

Sushma Andhare : मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अंधारे करणार तक्रार; प्रचार सभेतील भाषणावर घेतला आक्षेप

SCROLL FOR NEXT