Tv Entertainment News: टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांपासून ओटीटी माध्यमानं मोठी झेप घेतल्याचे दिसून आले आहे. त्यातील कंटेट हा प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. मात्र त्याचा परिणाम हा चित्रपट माध्यमावर झाला (Social media Viral News) आहे. प्रेक्षकांनी थिएटरकडे पाठ फिरवल्याचेही दिसत आहे. कोरोनामुळे ओटीटीकडे प्रेक्षकांचा ओढा वाढला. त्यावर येणाऱ्या मालिका, त्याचा प्रभाव, त्यातील कलाकार आणि लक्षवेधी आशय यामुळे हे माध्यम सध्याच्या (Tollywood News) घडीला सर्वाधिक परिणामकारक माध्यम ठरल्याचे दिसून आले आहे. ओटीटीचा दुसरा सर्वात मोठा फायदा हा सर्जनशील कलाकार, लेखक यांना झाला आहे. त्यांच्यातील सर्जनशीलता ही वेगवेगळ्या प्रकारे समोर आली आहे.
नेहमीचे कलाकार, लेखक जेव्हा एखादी कलाकृती निर्माण करतात तेव्हा (Ekan Anekan news) त्याच्याबद्दल प्रेक्षकांना कुतूहल तर असतेच. मात्र जेव्हा एखादा जेलमधील कैदी एखाद्या मालिकेची स्क्रिप्ट लिहितो, जेलमध्ये शॉर्ट फिल्मची निर्मिती करतो तेव्हा ती गोष्ट त्यांना आग्रहाने जाणून घ्यावीशी वाटते असे दिसून आले आहे. जेलमधील कैद्यांच्या आयुष्यात बदल व्हावा, त्यांची वृत्ती बदलून त्यांनी पुन्हा एकदा वेगळ्या दृष्टीकोनातून जगाकडे पाहावे यासाठी जेल प्रशासन नेहमीच विविध उपक्रम राबवताना दिसून येते. पोलिसांच्या कारनाम्यावर एका कैद्यानं लिहिलेली स्क्रिप्ट चर्चेत आली आहे. त्याच्यावर एका चित्रपटाची निर्मिती केली आहे.
केरळमधील कासरगोडस्थित चिमेनी ओपन प्रिझनमध्ये असणाऱ्या कैद्यानं ही कामगिरी केली आहे. शा थाचिल्लम नावाच्या कैद्यानं त्या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली आहे. एकन अनेकन नावाच्या या चित्रपटामध्ये वेगवेगळ्या लेखकांनी योगदान दिले आहे. थाचिल्लम हा त्यापैकी एक आहे. इरिनजालाक्कुडमध्ये राहणाऱ्या थाचिल्लमनं तीस वर्षांपूर्वी एकाची हत्या केली होती. त्यानंतर त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली. त्याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. जेलमध्ये त्यानं आपल्यातील कल्पकतेला वाव दिला. आणि त्याची लेखनकला बहारास आल्याचे दिसून आले.
2018 मध्ये जेल प्रशासनानं कैद्यांच्या आयुष्यात बदल व्हावेत यासाठी काही उपक्रम राबवण्यास सुरुवात केली होती. त्यात त्यांनी फिल्ममेकिंग ट्रेनिंगचे आयोजन केले होते. त्यात थाचिल्लमानं भाग घेत आपली सर्जनशीलता दाखवून दिली आहे. यापूर्वी त्यानं जेल वॉर्डन आणि अन्य कैद्यांच्या मदतीनं एक शॉर्ट फिल्मची निर्मिती केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.