Samantha Ruth Prabhu esakal
मनोरंजन

समंथाचा 'आरपार' ड्रेस, चर्चा होणारच नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

टॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा (Actress Samantha) ही जेव्हा मनोज वाजपेयीच्या द फॅमिली मॅनमधून (The Family Man) समोर आली होती.

सकाळ ऑनलाईन टीम

Tollywood News: टॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा (Actress Samantha) ही जेव्हा मनोज वाजपेयीच्या द फॅमिली मॅनमधून (The Family Man) समोर आली होती. त्यावेळी तिला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता. या मालिकेतील काही गोष्टींमुळे समंथाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये खळबळ उडाल्याचे दिसून (Social media news) आले. तिनं नागा चैतन्यकडून (naga chaitanya) घटस्फोट घेतला. दरम्यान समंथा ही अल्लु अर्जुनच्या (Allu arjun pushpa) पुष्पामध्ये दिसली. त्यामध्ये तिनं अॅटम साँग करुन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून समंथा भलत्याच बोल्ड अवतारात दिसते आहे. तिनं सोशल मीडियावर शेयर केलेल्या फोटोंना चाहत्यांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. समंथानं आपल्या लग्नाची साडी ही पुन्हा नागा चैतन्य आणि त्याच्या फॅमिलीली परत केल्याची बातमी समोर आली आहे.

सध्या समंथाचा बोल्ड लूक समोर आला आहे. त्यावरुन तिला काही नेटकऱ्यांनी ट्रोलही केले आहे. पुष्पातील तिच्या हटके सादरीकरणाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. समंथा गेल्या काही दिवसांपासून भलतीच बोल्ड झाल्याचे दिसून आले आहे. समंथानं तिच्या इंस्टावरुन काही लेटेस्ट फोटो शेयर केले आहेत. त्या फोटोमध्ये तिच्या ट्रान्सफरंट ड्रेसनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. फोटोमधील हॉट अवतार पाहून नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंटस दिल्या आहेत. समंथा सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. तिचा फॅन फॉलोअर्सही मोठा आहे. त्यामुळे सोशल मीडियावरुन लोकप्रियता कॅश करण्याचा समंथाचा प्रयत्न चाहत्यांच्या पसंतीस पडल्याचे दिसून आले आहे.

चाहत्यांना समंथाचा लूक आवडला आहे. त्यांनी त्या लूकचं कौतूकही केलं आहे. समंथा गेल्या काही दिवसांपासून तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत आली आहे. तिनं जेव्हा नागा चैतन्य सोबत घटस्फोटाचा निर्णय घेतला तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. समंथाच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचे झाल्यास, ती आमीर खानच्या लाल सिंग चढ्ढा नावाच्या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai CID Raid Kolhapur : मुंबई सीआयडीची कोल्हापुरात मोठी कारवाई अचानक इस्माईल, दस्तगीर या सख्या भावांना उचललं, कोट्यावधींचा घोटाळा...

Pan Card : तुमचा PAN नंबर रँडम नाही! प्रत्येक अक्षरात लपले आहे तुमचं गुपित; जाणून घ्या काय अर्थ आहे

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठीच्या घरात होणार श्रेयस तळपदेची एंट्री ? "लोक लक्ष वेधून घेण्यासाठी.."

अंबरनाथमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, काँग्रेसच्या १२ नगरसेवकांचा भाजपप्रवेश; निकालानंतर १८ दिवसात असं काय घडलं?

शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंनंतर महायुतीची सभा होणार, चार पक्षांनी मागितलेल्या तारखा; अखेर BMCने काढला तोडगा

SCROLL FOR NEXT