Tollywood: 'Pushpa: The Rise' to release in Russia on December 8 Google
मनोरंजन

Tollywood: 'पुष्पा- द राइज' चित्रपटाने रशियामध्ये होणाऱ्या 5 व्या भारतीय चित्रपट महोत्सवाची सुरुवात...

रशियात होणाऱ्या या महोत्सवात करण जोहरच्या ड्रामासह भारतीय चित्रपटसृष्टीतील 6 हिट चित्रपटांचा समावेश असणार आहे.

प्रणाली मोरे

Tollywood: १ ते ६ डिसेंबर दरम्यान, भारतीय चित्रपट महोत्सवाचा पाचवा वर्धापन दिन रशियातील २४ शहरांमध्ये होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन चित्रपट कंपनी (इंडियन फिल्म्स)द्वारा भारतीय राष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र (एसआयटीए) यांसोबत मिळून, रशियन फेडरेशनचे मिनिस्ट्री ऑफ कल्चर तसेच रशियातील भारतीय दूतावासाच्या सहकार्याने केले जाणार आहे. मॉस्को, सेंट पीटर्सबर्ग, सोची आणि अनेक शहरांमध्ये राष्ट्रीय सिनेमा नेटवर्क (सिनेमा पार्क) मध्ये स्क्रीनिंगचे आयोजन केले जाईल. (Tollywood: 'Pushpa: The Rise' to release in Russia on December 8)

या महोत्सवात करण जोहरच्या ड्रामासह भारतीय चित्रपटसृष्टीतील ६ हिट चित्रपटांचा समावेश असून, यामध्ये रशियात सर्वात जास्त आवडला जाणारा म्यूझिकल मेलोड्रामा चित्रपट 'डिस्को डान्सर'चा देखील समावेश आहे. तसेच, सुकुमारद्वारा लिखित आणि दिग्दर्शित 'पुष्पा: द राइज' या ॲक्शन ॲडव्हेंचर चित्रपटाने महोत्सवाचा शुभारंभ होईल.

भारतीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन समारंभ १ डिसेंबर रोजी मॉस्को येथील "ओशनिया" शॉपिंग सेंटर येथे होईल. 'पुष्पा: द राइज' चित्रपटाचे लेखक आणि मुख्य कलाकार पुरस्कार विजेता अभिनेता अल्लू अर्जुन, मॉडेल आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक सुकुमार आणि निर्माता रविशंकर देखील उपस्थित असणार आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

उद्घाटन समारंभासाठी टोड्स बॅलेचे संस्थापक आणि दिग्दर्शक अल्ला दुहोवा यांनी "पुष्पा: द राइज" चित्रपटाच्या साउंडट्रॅकसाठी एक आकर्षक नृत्यदिग्दर्शन केले आहे. तसेच, ३ डिसेंबर रोजी 'पुष्पा: द राइज'चे सर्व कलाकार आणि क्रू सदस्य सेंट पीटर्सबर्ग येथील "गॅलेरिया" शॉपिंग सेंटर येथे चित्रपटाच्या स्क्रीनिंगला उपस्थित राहतील.

या चित्रपट महोत्सवात सुकुमारद्वारा दिग्दर्शित 'पुष्पा: द राइज' (२०२१) या चित्रपटाचा समावेश असून, इतर लोकप्रिय भारतीय चित्रपटांमध्ये करण जोहर दिग्दर्शित 'माय नेम इज खान' (२०१०), बब्बर सुभाष दिग्दर्शित 'डिस्को डान्सर' (१९८२), एसएस राजामौलीचा 'आरआरआर: राइज रोअर रिवोल्ट' (2022), संजय लीला भन्साली दिग्दर्शित 'दंगल' (2016), सिद्धार्थ आनंदचा 'वॉर' (२०१९) या चित्रपटांचा देखील समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

Video : दगडाच्या काळजाची आई! पोटच्या नकोशा मुलीला रस्त्यावर टाकून गेली पळून; कुत्र्याने बाळाच्या...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Bharatmala Scheme : भारतमाला योजनेला धक्का: सुरत-चेन्नई महामार्ग रद्द होण्याची शक्यता; नाशिकचे हजारो कोटींचे प्रकल्प अधांतरी

Latest Maharashtra News Updates : मुंबईतील ऐतिहासिक विधि महाविद्यालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फलकाचं उद्घाटन

SCROLL FOR NEXT