Madhurani gokhale Prabhulkar, Aai Kuthe Kay Karte actress Instagram
मनोरंजन

'आई कुठे काय करते'चा TRP घसरला; 'ही' मालिका ठरली नंबर १

जाणून घ्या, टॉप १० मालिका

स्वाती वेमूल

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत नेहमीच अग्रस्थानी असते. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून या मालिकेचा टीआरपी कमी झाल्याचं पहायला मिळत आहे. नेहमीच पहिल्या स्थानी असणारी ही मालिका आता थेट चौथ्या क्रमांकावर घसरली आहे. त्यामुळे मालिकेतील लग्नसोहळा विशेष एपिसोड्स प्रेक्षकांना आवडले नसल्याचं स्पष्ट होतंय. टीआरपीच्या यादीत सलग दुसऱ्या आठवड्यात 'रंग माझा वेगळा' या मालिकेने बाजी मारली आहे. ही मालिका पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आली आहे. तर दुसरा क्रमांक 'स्टार प्रवाह धुमधडाका २०२२' या भागाने पटकावला आहे. (TRP Report)

जयदीप आणि गौरीची मालिका 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही तिसऱ्या स्थानी आहे. तर 'मुलगी झाली हो' ही मालिका गेल्या दोन आठवड्यांपासून पाचव्या क्रमांकावर आहे. 'फुलाला सुगंध मातीचा' ही मालिका सातव्यावरून सहाव्या क्रमांकावर आली आहे. तर 'माझी तुझी रेशीमगाठ' ही श्रेयस-प्रार्थनाची मालिका आठव्यावरून सातव्या क्रमांकावर आली आहे. 'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका आठव्या क्रमांकावर आहे.

नवव्या स्थानावर 'स्वाभिमान: शोध अस्तित्वाचा' ही मालिका आहे. तर गेल्या आठवड्यात नवव्या क्रमांकावर असलेली 'येऊ कशी तशी मी नांदायला' ही मालिका दहाव्या क्रमांकावर गेली आहे. यंदाच्या आठवड्यात 'देवमाणूस' या मालिकेला पहिल्या दहामध्ये स्थान मिळू शकलं नाही. नव्या कथेसह या मालिकेचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र ही कथा प्रेक्षकांना फारशी रुचत नसल्याचं दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भयंकर! ४८७ हून अधिक पुरुषांसोबत शरीरसंबंधासाठी दबाव, सिगारेटचे चटके, मारहाण अन्... प्रियकराचं प्रेयसीसोबत पाशवी कृत्य

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरात ६० लाखांहून अधिक किमतीचा गोवंश जप्त; १३१ गोवंशांची सुटका, ८ आरोपींवर ४ गुन्हे दाखल

SRH vs RR Eliminator IPL 2026: वैभव सूर्यवंशीचे वादळ पाहून काव्या मारनच्या चेहऱ्याचा रंग उडालेला... Boss Baby बाद होताच कशी होती तिची रिअ‍ॅक्शन ते पाहा... Video Viral

Koregaon Park Raid : पुण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! वेश्याव्यवसाय करणाऱ्या केनियाच्या 4 तरुणींची सुटका; कोरेगाव पार्क हादरलं

Fuel Price Hike: इंधनाचे दर पुन्हा वाढले! बुधवारी मध्यरात्रीपासून नवीन दरवाढ लागू; पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT