The Truth Behind Salman Khan & Sonakshi Sinha's Alleged Wedding Pic Revealed! Google
मनोरंजन

सलमान-सोनाक्षीच्या 'मॉर्फ' फोटोमागचं सत्य समोर;खऱ्या फोटोतले दोघे कोण?

सोनाक्षीनं फोटो मॉर्फ करणाऱ्यांना आणि अफवांवर विश्वास ठेवणाऱ्यांना 'मूर्ख' म्हटलं आहे

प्रणाली मोरे

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो जोरदार व्हायरल झाला,जो पाहिल्यावर सगळ्यांनी तोंडात बोटं घातली होती. अर्थात तो फोटो होताच इतका बोलका,आणि त्याचा विषय सगळ्यांचा फेव्हरेट. हो, तो फोटो होता सलमान-सोनाक्षीच्या साखरपुड्यातील अंगठी घालतानाचा क्षण टीपणारा. त्या फोटोवरनं एकच अफवा सगळीकडे पसरली की सलमान-सोनाक्षी लग्न करत आहेत. पण आता त्या फोटोमागचं सत्य समोर आलं आहे,की तो फोटो खोटा होता म्हणजे ती मॉर्फ इमेज होती. खरंतर त्या अफवा पसरवणाऱ्या फोटोवर सोनाक्षीही भडकली होती. तिनं अफवा पसरवणाऱ्यांना आणि त्यावर विश्वास ठेवणाऱ्या दोघांना 'मुर्ख' म्हणून संबोधलं होतं. ती म्हणाली होती,''तुम्हाला फोटो आणि मॉर्फ केलेला फोटो यातला साधा फरक कळत नाही.मुर्ख कुठले''. आणि तिनं स्माइली इमोजी पोस्ट केले होते.

त्या फोटोत सलमान(Salman Khan) आणि सोनाक्षी(Sonakshi Sinha) दिसत मात्र सुंदर होते. सलमाननं छान पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि बेज रंगाचा जॅकेट घातला होता तर सोनाक्षीही ट्रेडिशनल साडीमध्ये नव्या नवरीच्या थाटात देखणी दिसत होती. आता तो फोटो इतका चालाखीने मॉर्फ केला होता की पाहणाऱ्याला विश्वास बसलाच पाहिजे. त्यात सलमान आणि सोनाक्षी दोघेही बॉलीवूड मधले मोस्ट एलिजिबल बॅचलर आहेत. त्यामुळे अर्थातच त्यांचे चाहते दोघांच्या लग्नाची चातकासारखी वाट पाहतायत. तेव्हा पटकन विश्नास ठेवला नं राव त्या मॉर्फ फोटोवर सगळ्यांनी. तो फोटो जेव्हा सोशल मीडियावर पोस्ट केला तेव्हा काहींनी म्हटलं,''दोघांनी दुबईत गुपचूप लग्न उरकलं'',तर काहींनी म्हटलं,'' मुंबईतच घरच्यांच्या उपस्थितीत हे लग्न झटपट पार पडलं''.

सोनाक्षीनं बॉलीवूडमध्ये सलमानसोबत 'दबंग'(Dabang) सिनेमाच्या माध्यमातून पदार्पण केलं होतं. ती दबंगच्या पुढील सगळ्याच भागांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसली आहे. सोनाक्षी लवकरच आपल्याला ‘Double XL’या सिनेमात दिसणार आहे. यात तिच्यासोबत हुमा कुरेशी देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. त्यासोबतच रितेश देशमुख,साकिब सलीम सोबत ती 'काकुडा' या सिनेमात देखील महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारत आहे. तर सलमान 'टायगर ३' घेऊन आपल्या लवकरच भेटीला येतोय. पुढच्या वर्षी ईद निमित्तानं हा सिनेमा प्रदर्शित होतोय,अर्थात सलमानच्या परंपरेप्रमाणे बरं का. सलमान जॅकलिनसोबत 'किक २' मध्येही दिसणार आहे. तर 'कभी ईद,कभी दिवाली' सिनेमात तो पूजा हेगडे सोबत रोमान्स करताना दिसेल.

Kollywood celebrity couple Arya and Sayeesha who tied the knot in March 2019.

आता हे सगळं सलमान-सोनाक्षीबद्दल झालं. पण तुम्हाला जाणून घ्यायचंय कोणाच्या ओरिजनल फोटोला मॉर्फ करून सलमान-सोनाक्षीच्या लग्नाची अफवा पसरली होती? हो,ते ओरिजनल फोटोतील दोघेही कॉलीवूडचे प्रसिद्ध कलाकार आहेत बरं का. कॉलीवूडचे आर्या आणि सईशा हे दोन कलाकार दोन वर्षांपूर्वी लग्नबंधनात अडकले होते. त्यांच्या लग्नातील फोटोचा गैरवापर करत सलमान-सोनाक्षीच्या लग्नाची अफवा पसरवली ,हे सत्य आता समोर आलं आहे. तेव्हा पुन्हा सलमान आणि सोनाक्षी दोघांच्या लग्नाच्या बातमीला पूर्णविराम मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

London Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान दुर्घटनेची आता लंडनमध्ये पुनरावृत्ती

ENG vs IND: लॉर्ड्सवर पुन्हा ड्रामा! आकाश दीपनं फिजिओला बोलावलं, स्टोक्सने केएल राहुलसमोर टाळ्या पिटल्या; Video

Wimbledon 2025 Final: यानिक सिनरने वचपा काढला,अल्काराजला हरवत जिंकलं विम्बल्डनचं विजेतेपद

ENG vs IND: भारतासमोर सोप्पं लक्ष्य, पण इंग्लंडनेही कसली कंबर; 3rd Test जिंकण्यासाठी शेवटच्या दिवसाचं कसं समीकरण?

शाळा ५ किमी अंतरावर असेल तर विद्यार्थ्याला ६००० रुपये मिळणार, सरकारची मोठी घोषणा, योजनेचा लाभ कसा मिळवायचा?

SCROLL FOR NEXT