tu jhoothi main makkar inside story..deepika padukone was first choice Instagram
मनोरंजन

Deepika Padukone: नाहीतर 'तू झूठी,मै मक्कार' सिनेमात दीपिका पदूकोणच असती; पण...

'तू झूठी.. मै मक्कार' सिनेमाला बॉक्सऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता या सिनेमाच्या इनसाइड स्टोरीज समोर येत आहेत.

प्रणाली मोरे

Deepika Padukone: बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा 'तू झूठी..मै मक्कार' सिनेमानं दोन दिवसांत २५ करोडची कमाई केली आहे. एकीकडे जिथं रणबीरचा कॉमेडी अंदाजही लोकांना भावताना दिसतोय तिथे दुसरीकडे श्रद्धाच्या बोल्ड आणि क्यूट अंदाजावार लोक फिदा झालेयत.

पण तुम्हाला माहित आहे का की या सिनेमाचे दिग्दर्शक लव रंजन यांची पहिली पसंती श्रद्धा कपूर नाही तर दीपिका पदूकोण होती असं वृत्त त्यावेळी समोर आले होते. (tu jhoothi main makkar inside story..deepika padukone was first choice)

या सिनेमात खरंतर रणबीर कपूर आधी अजय देवगण काम करणार होता आणि अभिनेत्रीसाठी दीपिका पदूकोणला पसंती होती. आधी काही कारणानं अजय देवगण सिनेमातून बाहेर पडला तर जुलै २०१९ मध्ये,दीपिका लव रंजनच्या घराबाहेर दिसली होती. मात्र, काही कारणास्तव दीपिकाला हा चित्रपट करता आला नाही. त्यानंतर लव रंजननं स्क्रीप्टमध्ये बदल करून शेवटी रणबीर-श्रद्धाला कास्ट केलं.

हेही वाचा: नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

दीपिका पदूकोण सद्या 'पठाण' सिनेमामुळे भलतीच चर्चेत आहे. या सिनेमातील तिच्या लूकला आणि अभिनयाला चाहत्यांनी खूप पसंत केलं आहे.

दीपिकाच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं झालं तर तिच्या खात्यात प्रभाससोबतचा 'प्रोजेक्ट के', हृतिक रोशन सोबतचा 'फायटर',आणि अमिताभ बच्चन सोबतचा 'द इंटर्न' चा समावेश आहे.

याव्यतिरिक्त 'सिंघम' च्या नव्या भागातही ती दिसणार आहे. तसंच,दीपिकाकडे सध्या 'महाभारत' आणि एक हॉलीवूड सिनेमा आहे. तसंच,शाहरुखच्या 'जवान' सिनेमातही दीपिकाचा कॅमियो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane DCC Bank : ठाणे जिल्हा बँकेवर भाजप-शिवसेना महायुतीचा झेंडा! रवींद्र चव्हाण-एकनाथ शिंदेंच्या 'चाणक्यनीती'मुळे बविआचा गेम ओव्हर, नवे अध्यक्ष कोण?

Deccan Queen Heritage Coach : मुंबई-पुणे 'डेक्कन क्वीन' नव्या हेरिटेज लूकमध्ये; चहा, नाष्टा, डायनिंग ट्रेनचा अनुभव खतरनाक

Latest Marathi News Update : देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चेला उधाण, बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

'तू का आला नाहीस?' असं म्हणत न जन्मलेल्या बाळाला पत्रं लिहायच्या ओम पुरी यांच्या पहिल्या पत्नी, बसलेला मानसिक धक्का

Oman Coast Incident : ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर मोठा हल्ला, १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

SCROLL FOR NEXT