Tuja Maja Sapan new serial on sony marathi telecast from 19 june based on kusti sakal
मनोरंजन

Tuja Maja Sapan: कोल्हापूरकरांनो; कुस्तीच्या मातीतून उठणार प्रेमाचं तूफान.. लवकरच येतीय खास मालिका..

'सोनी मराठी'वर येतीय नवी मालिका 'तुजं माजं सपान'

नीलेश अडसूळ

Tuja Maja Sapan: कोल्हापूरच्या मातीतील एक रांगडी कथा घेऊन लवकरच नवी मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येत आहे. सोनी मराठी वाहिनी कायमच निरनिराळे विषय मांडत वेगवेगळ्या मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. ‘तुजं माजं सपान’ ही दैनंदिन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.

त्याची झलक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडते आहे. नुकताच मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यामध्ये दोघेही आपल्याला कुस्ती करताना दिसताहेत.

प्राजक्ता आणि वीरू यांच्या प्रेमाची निराळी गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. मालिकेत प्राजक्ता आणि वीरेंद्र यांच्या प्रेमाचे तुफान कसे येणार, हे पाहायला मिळेल. मालिकेत दोघेही कुस्तीपटू दाखवले आहेत आणि एखाद्या मालिकेत कुस्तीपटूंची जोडी प्रेक्षकांना पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे.

(Tuja Maja Sapan new serial on sony marathi telecast from 19 june based on kusti)

कुस्ती या दोघांना कशा प्रकारे एकत्र आणेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. वीरूच्या डोळ्यांतले त्याचे स्वप्न प्राजक्ता पूर्ण करेल का आणि त्यांचा हा प्रवास प्रेक्षकांना कशा प्रकारे पाहायला मिळेल, हे आपल्याला मालिकेत दिसणार आहे.

ही मालिका १९ जूनपासून सोनी मराठी वाहिनीवरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेची मूळ कहाणी ही कोल्हापूरची आहे. प्राजक्ताची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री ही मुळातच कुस्तीपटू आहे. साताऱ्याला राहणारी ही अभिनेत्री गेली अनेक वर्षे कुस्तीचा सराव करते आहे.

तिचे नाव प्राजक्ता चव्हाण आहे. आजवर तिने कुस्तीच्या विश्वात चांगले नाव कमविले आहे. तिने आत्तापर्यंत राष्ट्रीय स्तरावर आणि राज्य स्तरावर कुस्तीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आता मालिकेतील व्यक्तिरेखेबरोबरच कुस्ती जोपासणारी प्राजक्ता पाहायला मिळणार आहे.

वीरूच्या भूमिकेत आपल्याला संकेत चिकटगावकर हा गुणी अभिनेता पाहायला मिळणार आहे. संकेत हा मूळच्या औरंगाबादजवळील वैजापूर इथला आहे. हे दोन्ही नवे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येताहेत.

सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या वेटक्लाऊड या निर्मिती संस्थेने ह्या मालिकेची निर्मिती केली जात आहे. सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांची ही पहिली दैनंदिन मालिका असणार आहे. 'तुजं माजं सपान' या मालिकेचं चित्रीकरण नाशिक येथे करण्यात येते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC मॅचमध्ये राडा! मैदानात खेळाडूंमध्ये बाचाबाची अन् स्टँड्समध्ये चाहत्यांची तुफान हाणामारी; Video Viral

Unseasonal Rain : उरुळी कांचनसह परिसराला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले; विद्युत खांब, झाडांची पडझड, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान

Latest Marathi News Live Update : जैकांदिवली – चारकोपमध्ये गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याने लोक संतप्त

सगळे दिसले पण हनुमान कुठेय? 'रामायण' टीझरमध्ये हनुमान न दिसल्याने प्रेक्षक चकीत; हे आहे कारण

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT