tuzech mi geet gat ahe
tuzech mi geet gat ahe  sakal
मनोरंजन

मराठीतील पहिली म्युझिकल मालिका येतेय.. तब्बत १८ गाणी आणि २० कलाकार..

नीलेश अडसूळ

मालिका विश्वात अनेक प्रयोग होत असतात. सासू सुनेच्या कथे पलीकडे जाऊन नवे विषय , नवा आशय वाहिन्या समोर आणत आहेत. असाच एक प्रयोग स्टार प्रवाह (star pravah) वाहिनीने केला. मराठीतील पहिली म्युझिकल मालिका घेऊन ही वाहिनी सज्ज झाली आहे. 'तुझेच मी गीत गात आहे' (tujhech mi geet gaat ahe) असे या मालिकेचे शीर्षक असून येत्या २ मे पासून मालिका सुरू होणार आहे.

मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोच आहे त्यासोबतच प्रोमोमध्ये वापरण्यात आलेली गाणी विशेष लक्ष वेधून घेत आहेत. छोट्या स्वरावर चित्रित झालेलं ‘फुलपाखराच्या पंखावरचे म्या रंग मोजते सारे, मलेच ठाऊक गात गाणे येती हे कुठून वारे’ हे गाणं असो किंवा अभिजीत खांडकेकर (abhijeet khandkekar) म्हणजेच गायक मल्हार कामतवर चित्रीत झालेलं ‘उडून ये फुलपाखरा, उडून ये माझ्या घरा’ ही दोन्ही गाणी प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालत आहेत.

गाण्याचं स्वप्न उराशी बाळगणारी चिमुकली स्वरा आणि ज्याचं संपूर्ण आयुष्य सुरांनी भारलं आहे असा सुप्रसिद्ध गायक मल्हारचा सांगितिक प्रवास दाखवणारी ही मालिका आहे. त्यामुळे गाणं हा या मालिकेचा आत्मा आहे. या मालिकेसाठी एक दोन नाही तर आत्तापर्यंत तब्बल १८ गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत. कथानकाच्या गरजेनुसार आणखी गाणी करण्याचा स्टार प्रवाह वाहिनीचा मानस आहे. त्यामुळे तुझेच मी गीत गात आहे ही मराठीतील पहिली म्युझिकल मालिका ठरणार आहे.

अवधूत गुप्ते,कौशल इनामदार, अविनाश-विश्वजीत, निलेश मोहरीर, पंकज पडघन, रोहन-रोहन, चिनार-महेश या आघाडीच्या संगीतकारांनी ही गाणी संगीतबद्ध केली असून स्वप्नील बांदोडकर, आर्या आंबेकर, ऋषिकेश रानडे, स्वरा बनसोडे यांच्या सुरांचा साज या गाण्यांवर चढला आहे. रोहिणी निनावे, कौशल इनामदार, अश्विनी शेंडे, श्रीपाद जोशी, दीप्ती सुर्वे, समीर सामंत या दिग्गज गीतकारांच्या लेखणीतून ही गाणी साकारली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: PM मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अॅक्शन मोडवर

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT