Tunisha Sharma Death
Tunisha Sharma Death esakal
मनोरंजन

Tunisha Sharma Death: तुनिषाचं पार्थिव पाहिलं आईला चक्कर आली, शोक आवरेना!

सकाळ डिजिटल टीम

Tunisha Sharma Mother Emotional Video: टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येनं मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. तिचा बॉयफ्रेंड शिझान खानचा या प्रकरणात मोठा सहभाग असल्याची चर्चा आहे. यासगळ्यात तुनिषाचा आईचा एक व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

तुनिषा आत्महत्या प्रकरणाचा पोलिसांनी वेगानं तपास सुरु केला असून त्यांना यासंबंधी अनेक धक्कादायक गोष्टी कळल्या आहे. तुनिषाच्या आईनं देखील काही खुलासे केले असून त्यामध्ये शेवटपर्यत तुनिषा आपल्याला काही करुन शिझानशी लग्न करायचं आहे, असे सांगत होती. त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आलबेल नव्हते. त्यामुळे ती नैराश्यात असल्याचेही तुनिषाच्या आईनं सांगितलं आहे.

Also Read- जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

एका मुलाखतीमध्ये शिझानविषयी सांगताना तुनिषाच्या आईनं आपला संताप व्यक्त केला आहे. आता माझी मुलगी गेली आहे. मात्र ज्याच्यामुळे तिनं हे टोकाचे पाऊल उचलले त्या शिझानला शिक्षा व्हायला हवी. अशी मागणी पोलिसांकडे तुनिषाच्या आईनं केली आहे. दरम्यानच्या काळात तुनिषाच्या आईचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांना तुनिषाचे पार्थिव पाहताच चक्कर आल्याचे दिसून आले आहे. नेटकऱ्यांनी त्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत या प्रकरणाचा तातडीनं तपास व्हावा. अशी इच्छा व्यक्त केली आहे.

मुलीला गमावल्यानंतर तुनिषाच्या आई यांची प्रकृती खालावल्याचे दिसून आले आहे. रुग्णालयात तुनिषाचं पार्थिव पाहताच त्यांना शोक अनावर झाला होता. त्यावेळी परिवारातील काही सदस्यांनी त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावरुन तुनिषा आत्महत्या प्रकरणाची मोठ्या प्रमाणावर चर्चा होताना दिसते आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : महिला अपहरणप्रकरणी रेवण्णा यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT