Tunisha Sharma Suicide Big update Google
मनोरंजन

Tunisha Sharma Death: लग्नासाठी तुनिषावर धर्म बदलण्याची शीजाननं केलेली सक्ती?, यामुळे बळावला पोलिसांचा संशय..

तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी तिचा सहकलाकार शीजान खानला अटक केलीय,त्यानंतर नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत.

प्रणाली मोरे

Tunisha Sharma Death: टी.व्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्ये प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेला शीजान खान आपल्या आणि तुनिषातील नात्यावर खुलासा करत आहे. शीजाननं चौकशीत सांगितलं आहे की, त्याचे आणि तुनिषाचे ब्रेकअप झाले होते. त्यानं ब्रेकअपचं कारण त्यांच्या वयातील अंतर आणि वेगळे धर्म असं सांगितलं आहे. शीजान खाननं सांगितलं आहे की तुनिषानं काही दिवस आधी देखील आत्महत्येचा प्रयत्न केला होता.(Tunisha Sharma Suicide Big update)

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शीजान खानने पोलिसांच्या चौकशी दरम्यान सांगितलं आहे की तुनिषानं तिच्या मृत्यूच्या काही दिवस आधी देखील आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळी शीजाननं तुनिषाला तसं करण्यापासून थांबवलं होतं. या संदर्भात त्यानं तुनिषाच्या आईला देखील सांगितलं होतं असं तो म्हणाला. त्यांनी तुनिषाकडे लक्ष ठेवावं असं देखील त्यानं अभिनेत्रीच्या आईला सूचित केलं होतं. पोलिस शीजान खानच्या बोलण्यात किती खरेपणा आहे याची फेरतपासणी करीत आहेत. पोलिस हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत की तुनिषानं खरचं याआधी देखील आत्महत्येचा प्रयत्न केला होता का? तिच्या आत्महत्येमागे ब्रेकअप हेच कारण होतं की आणखी कुठलं या दिशेने देखील तपास सुरू आहे.

दुसरीकडे शीजानने पोलिसांकडे अभिनेत्री सोबत असलेल्या आपल्या अफेअरची कबूली दिली आहे. सोबतच वेगळे धर्म आणि दोघांमधील वयाचं अंतर ही ब्रेकअपची कारणं होती असं देखील शीजाननं पोलिसांना सांगितलं आहे. आता पोलिसांना हे जाणून घ्यायचं आहे की,शीजाननं लग्नासाठी तुनिषावर धर्म बदलण्याची सक्ती केली होती का?,तुनिषा २० वर्षांची होती,तर शीजान २८ वर्षांचा आहे. तुनिषाचे कुटुंबिय शीजानवर एकाच वेळेस अनेक मुलींसोबत संबंध ठेवण्याचा आणि तुनिषाचा विश्वासघात केल्याचा आरोप आता करत आहेत. तुनिषाच्या आईच्या म्हणण्यानुसार, ६ महिने आधी दोघांमध्ये प्रेम फुललं होतं. तर तुनिषाच्या आत्महत्येच्या १५ दिवस आधीच अभिनेत्यानं तिच्यासोबत ब्रेकअप केलं होतं. ज्यामुळे तुनिषा तणावात होती. पोलिसांनी या प्रकरणात वेगानं तपास सुरू केला आहे.

वसई पोलिसांना या केसमध्ये आणखी एक मोठा मुद्दा हाती लागला आहे. पोलिसांच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार तुनिषानं आत्महत्या केली त्या दिवशी तुनिषा आणि शीजानने एकत्र लंच केलं होतं. पहिल्या शीफ्टचं शूटिंग संपल्यानंतर शीजान आणि तुनिषानं मेकअप रूममध्ये बसून एकत्र ३ वाजेपर्यंत लंच केलं. पोलिस आता यागोष्टीची तपासणी करत आहेत की या लंच दरम्यान असं काय घडलं की तुनिषानं ३.१५ वाजता आत्महत्या केली.

पोलिसांनी तुनिषा आणि शीजान दोघांच्या मोबाईल फोनला फॉरेंसिक लॅबमध्ये तपासासाठी पाठवलं आहे. पोलिसांना संशय आहे की मेकअप रूमममध्ये लंच दरम्यान दोन्ही कलाकारांमध्ये काहीतरी घडलं होतं,ज्या कारणानं तुनिषानं आत्महत्येसारखं मोठं पाऊल उचललं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope : 12 तारखेपासून सुरू होतोय गजकेसरी राजयोग! वृषभसह 4 राशीचं भाग्य उजळणार; होणार धनलाभ, प्रेमात यश, मोठं स्वप्न होईल पूर्ण

Masina Hospital Mumbai : मुंबईतील मसीना रूग्णालयात संतापजनक घटना! प्रोसेस अभावी मृतदेह आठ तास अडवून धरला

Google Search : 31 डिसेंबरच्या रात्री गुगलवर सगळ्यांत जास्त काय सर्च करण्यात आलं? धक्कादायक रिपोर्टमुळे जगभर खळबळ

Sanjay Raut : "सत्ताधारी गुंडांशिवाय निवडणूक जिंकूच शकत नाही"; पुण्यातून संजय राऊतांचा भाजप-राष्ट्रवादीवर घणाघात!

Ajit Pawar : “पुणेकरांना पाणी नाही, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; भाजपाच्या महापालिका राजवटीत शहराचे अतोनात नुकसान”– अजित पवार!

SCROLL FOR NEXT