Tunisha's Driver talk with her mother just before 20 minutes of actress suicide Google
मनोरंजन

Tunisha Suicide करण्याच्या २० मिनिटे आधीच ड्रायव्हरनं फोनवर अभिनेत्रीच्या आईला दिलेली माहिती..म्हणालेला..

तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणात रोज नवीन खुलासे समोर येत असून केसला नवं वळण मिळताना दिसत आहे.

प्रणाली मोरे

Tunisha Suicide: टी.व्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्ये प्रकरणात पोलिसांना आता नवीन इनपुट्स मिळाले आहेत. यानंतर पोलिसांनी तुनिषाचा मामा पवन शर्मा यांना आज आणि तिच्याकडे घरकाम करणाऱ्या रेशमाला उद्या चौकशीसाठी बोलावले आहे. तुनिषाच्या आईनं पोलिसांना सांगितलं होतं की तुनिषाच्या आत्महत्या करण्याच्या २० मिनटे आधी त्यांनी तिच्या ड्रायव्हरला फोन केला होता. आणि तुनिषा विषयी विचारपूस केली होती. त्यावेळी ड्रायव्हरनं सांगितलं होतं की तुनिषा शर्मा शीजान खान सोबत बसून लंच करतेय. त्यानंतर ठीक २० मिनिटात तुनिषानं आत्महत्या केली.(Tunisha's Driver talk with her mother just before 20 minutes of actress suicide)

तुनिषा शर्माच्या आत्महत्येचं प्रकरण सध्या जोरदार चर्चेत आहे. अभिनेत्रीनं २४ डिसेंबर रोजी मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनंतर आता प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की तुनिषानं असं का केलं? पोलिस आता या घटनेमधील छोट्यातल्या छोट्या गोष्टीला शोधून काढण्यात गुंतली आहे. यासंदर्भात पोलिसांनी तुनिषाचे मामा पवन शर्मा यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. आज तुनिषाच्या मामाची साक्ष पोलिस नोंदवून घेणार आहेत. तुनिषाकडे घरकाम करणाऱ्या रेशमा नामक महिलेला देखील उद्या पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं आहे. मंगळवाली रेशमाची साक्ष पोलिस नोंदवून घेतील.

पोलिसांच्या आजपर्यंतच्या तपासा दरम्यान समोर आलं आहे की तुनिषा गेल्या काही दिवसांपासून टेन्शनमध्ये होती. तुनिषाच्या घरकाम करणाऱ्या बाईनं पोलिसांना प्राथमिक चौकशीत सांगितलं होतं की तुनिषा काही दिवसांपासून चिंतेत होती. आपण तिला याविषयी विचारलं होतं पण तिनं बोलणं टाळलं होतं. तुनिषाच्या आई वनिता यांनी देखील पोलिसांना सांगितलं होतं की १६ डिसेंबरला एंजायटी अटॅक आल्यानंतर तुनिषाची मनःस्थिती ठीक नव्हती. अटॅक आल्यानंतर ती सेटवर एक दिवसाआड शूटला जायची. पण जेव्हा ती सेटवर जायची तिचा मूड खराबच असायचा.

हेही वाचा: जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

तुनिषाच्या आईनं पोलिसांना सांगितलं आहे की तुनिषानं आत्महत्या करण्याच्या २० मिनिटं आधी तिच्या ड्रायव्हरला आपण फोन केला होता. त्यावेळी तुनिषा आनंदात होती आणि शीजानसोबत लंच करत होती. तिच्या ड्रायव्हरनं सांगितलं की शीजान आणि तुनिषा दोघंही खूश दिसतायत. पण त्यानंतर बरोबर २० मिनिटांनी तुनिषानं आत्महत्या केल्याचा फोन त्यांना आला. तुनिषाची आई म्हणाली की त्या २० मिनिटात असं काय घडलं की तुनिषा डीप्रेशनमध्ये गेली आणि तिनं गळयाला फास लावत आत्महत्या केली.

पोलिसांनी तुनिषा आणि शीजान दोघांचे मोबाईल फोन ताब्यात घेऊन फोरॅंसिक लॅबला तपासणीसाठी पाठवले आहेत. पोलिसांनी दोघांच्या फोनमधील डीटेल्स तपासायला सुरुवात केली आहे. त्यांच्या मेसेजेसलाही चेक केलं जात आहे. दोघांमधील कॉल्सला रिट्रीव केलं जात आहे. तुनिषाच्या आईनं पोलिसांना दिलेल्या माहितीत म्हटलं होतं की शीजान आणि तुनिषा यांच्यात सहा महिन्यापूर्वीच प्रेम बहरलं होतं. तुनिषा खूप खूश होती. पण मृत्यूच्या १५ दिवस आधीच शीजाननं तुनिषासोबत ब्रेकअप केलं होतं,ज्यामुळे अभिनेत्री तणावात होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC Meeting: ओबीसी उपसमिती सर्व कुणबी प्रमाणपत्रांचा अभ्यास करणार; भुजबळांनी मुख्यमंत्र्यांकडे दिले पुरावे

Uddhav Thackeray: आता मी पुन्हा येईन, पुन्हा येईन नाहीतर मी नेहमी येईन... देवेंद्र फडणविसांना टोला लगावत उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Velhe Accident : वेल्हे चेलाडी रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतला महिलेचा बळी; रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अडीच महिन्यात गेला दुसरा बळी

Jalgaon News : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या वेतनातून वसूल होणार रक्कम; एमपीडीए कारवाईतील त्रुटी जळगाव प्रशासनाला पडल्या महागात

Samsung Galaxy Z Fold 6 स्मार्टफोनवर चक्क 50 हजारचा डिस्काउंट, किंमत झाली निम्म्यापेक्षा कमी, ऑफर पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT