TV Actor Aditya Singh Rajput Who worked in cid found dead in his bathroom Esakal
मनोरंजन

CID Actor Death: CID मालिकेत काम करणाऱ्या 'या' अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू.. घरातील बाथरुममध्ये मिळाला मृतदेह

आदित्य सिंग राजपूत यानं 'सीआयडी' या मालिकेसोबतच 'स्प्लिट्सव्हिला' या रिअॅलिटी शोमध्ये तसंच काही सिनेमा आणि जाहिरातीतून काम केलं होतं.

प्रणाली मोरे

CID Actor Death: मनोरंजनक्षेत्राला धक्का पोहोचवणारी एक बातमी समोर आली आहे, काही टी.व्ही मालिका,सिनेमा आणि जाहिरातीत दिसलेला अभिनेता आणि मॉडेल आदित्य सिंह राजपूत याचं निधन झालं आहे.

समोर आलेल्या बातमीनुसार घराच्या बाथरुममध्ये त्याचा मृतदेह सापडला आहे. त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं गेलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. (TV Actor Aditya Singh Rajput Who worked in cid found dead in his bathroom)

आदित्य सिंग राजपूत केवळ ३२ वर्षांचा होता आणि त्यानं आपल्या मेहनतीच्या जोरावर इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण केली होती. आता तो या जगात राहिलेला नाही. तो मुंबईत अंधेरीमध्ये राहत होता.

राहत्या इमारतीत ११ व्या मजल्यावर तो राहत होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार आदित्यच्या दोन मित्रांना त्याचा मृतदेह बाथरुममध्ये मिळाला. त्यानंतर त्या दोघांनी वॉचमेनला मदतीला बोलावलं आणि आदित्यला तातडीनं रुग्णालयात नेलं. पण आदित्यने तोपर्यंत या जगाचा निरोप घेतला होता.

आदित्यच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही पण रिपोर्टमध्ये सूत्रांच्या माहितीनुसार बोललं जात आहे की त्याचा मृत्यू हा ड्रग्सचं सेवन अधिक केल्यानं झाला आहे.

आदित्याविषयी सांगायचं झालं तर त्यानं निव्वळ १७ व्या वर्षी आपलं करिअर सुरू केलं होतं. त्यानं मॉडेल म्हणून आपलं करिअर चांगलंच गाजवलं आणि त्यानंतर तो टी.व्ही मालिका आणि सिनेमांकडे वळला होता.

आदित्य टी.व्हीवरची प्रसिद्ध मालिका 'सीआयडी'च्या काही भागांमध्ये नजरेस पडला होता. त्यानं रिअॅलिटी शो 'स्प्लिट्सव्हिला' मध्ये देखील भाग घेतला होता. याव्यतिरिक्त त्यानं 'मैने गांधी को नहीं मारा' ,'क्रांतीवीर','यू,मी और हम' सारख्या सिनेमात काम केलं होतं.

अभिनयाव्यतिरिक्त त्यानं अनेक ब्रान्ड्ससाठी कास्टिंग कोऑर्डिनेटर म्हणून काम केलं होतं. आदित्य सोशल मीडियावर भलताच सक्रिय होता. इन्स्टाग्रामवर त्याचे ५ लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. तो तिथे नेहमी आपले फोटो,रील,व्हिडीओ शेअर करायचा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election Commission Report : दबावाखाली अर्ज माघारी? पुण्यातील बिनविरोध निवडणुकांवर आयोगाचा रिपोर्ट कार्ड

Shubman Gill : शुभमन गिलला संघातून वगळले, पुनरागमन लांबणीवर पडले; निवड समितिच्या निर्णयाने सर्वच अचंबित

Panchang 3 January 2026: आजच्या दिवशी दशरथ विरचित शनिस्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

Pume Municipal Election : भाजपच्या अनेकांचे बंड झाले थंड

अक्षय खन्नाने भर मंडपात गर्लफ्रेंडला केलेला किस, प्रेमात होता पुर्णपणे वेडा, कोण होती ती अभिनेत्री?

SCROLL FOR NEXT