TV ACTOR DAYA WILL BE SEEN IN MARATHI FILM SOON
TV ACTOR DAYA WILL BE SEEN IN MARATHI FILM SOON esakal
मनोरंजन

'दया का हाथ पडता है,तो..'CID Officer' विशाखासोबत झळकणार मराठी चित्रपटात

सकाळ डिजिटल टीम

जब दया का हाथ पडता है,तो मुँह के अंदर दातो से पियानो बजने लगता है. हे वाक्य लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत कोणीही एकलं की लगेच आठवण येते ती सीआयडी ऑफिसर दयाची.धाड धिप्पाड दयाची भूमिका साकारणाऱ्या दयानंद शेट्टीच्या अभिनयामुळे त्याला लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच ओळखतात.आता मात्र दया मराठी चित्रपटात त्याची दमदार एन्ट्री घेऊन येत असल्याचे कळते आहे.

मराठी हास्यजत्रेत विनोदी भूमिका साकारून लोकांना पोट दुखेपर्यंत हासवणारी अभिनेत्री विशाखा सुभेदारने अलीकडेच दयानंद शेट्टीसोबतची एक पोस्ट शेअर केली आहे.त्यातून दया लवकरच मराठी चित्रपटात दिसणार असल्याचे कळते आहे.महिनाभरापूर्वी विशाखा सुभेदारने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला.त्याबातची एक पोस्ट तीने तीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला पोस्ट केली आहे.त्यात तिने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’हा कार्यक्रमातून निरोप घेतल्याचे तिने सांगितले होते.या नंतर पुढे काय असा प्रश्न तीच्याबाबत सोशल मीडियावर उपस्थित होत होता.त्याचे उत्तर तीने तीच्या नव्या इन्स्टाग्राम पोस्टमधून सांगितले आहे.

अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.या पोस्टमध्ये विशाखाने CID मालिकेत दयाची भूमिका साकारणारा अभिनेता दयानंद शेट्टीसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. ते दोघेही लवकरच एका मराठी चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.विशाखाने हा फोटो शेअर करत दयानंद शेट्टीसोबत काम करण्याचा आनंद व्यक्त केला आहे.विशाखाने दयानंद शेट्टीसोबतचा फोटो शेअर करत त्याला हटके कॅप्शन दिले आहे. “तोड दो ये दरवाजा, दया…"

‘गरम किटली’ हा एक मराठी चित्रपट असणार आहे.गणेश 'रॅाक एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली' ‘गरम किटली’ या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. चित्रसेन नाहक आणि राजेश हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. या चित्रपटात दयासोबत आदित्य पैठणकर आणि श्रद्धा महाजन ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यासोबच विजय पाटकर, अंशुमन विचारे, कमलेश सावंत, विशाखा सुभेदार, मनीषा पैठणकर, विराज गोडकर, पल्लवी पाटील अशी सगळी स्टारकास्टही या चित्रपटात दिसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT