Ghanshyam nayak death sakal media
मनोरंजन

तारक मेहता का उल्टा चष्मा; 'नट्टू काका' यांचे निधन

संतोष भिंगार्डे

मुंबई : छोट्या पडद्यावरील तारक मेहता का उल्टा चष्मा या लोकप्रिय मालिकेमधील नट्टू काका (Nattu kaka role) या भूमिकेमुळे घरोघरी पोहोचलेले घनश्याम नायक (Ghanshyam nayak death) (वय 77) यांचे आज कर्करोगाने (cancer) मालाड (malad) येथील एका खासगी रुग्णालयात (private hospital) निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाची बातमी कळताच टीव्ही इंडस्ट्रीत दुःख व्यक्त करण्यात येत आहे.

घनश्याम नायक लहानपणापासूनच अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत होते. आतापर्यंत त्यांनी तीनशेहून अधिक हिंदी मालिका व शंभरहून अधिक हिंदी व गुजराती चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनेक गुजराती नाटकांमध्ये त्यांनी केले आहे तसेच साडेतीनशेहून अधिक गुजराती चित्रपटांसाठी डबिंग आर्टिस्ट म्हणून काम केले आहे. काही गुजराती चित्रपटांसाठी त्यांनी प्ले बॅक केले आहे. हम दिल दे चुके सनम,  बरसात, घातक, तेरे नाम असे काही त्यांनी काम केलेले हिंदी चित्रपट तर खिचडी, साराभाई व्हर्सेस साराभाई, दिल मिल गये अशा काही हिंदी मालिकांमध्ये त्यांनी काम केले.

साधारण एक वर्षांपूर्वी त्यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. त्यांच्यावर मालाड येथील रुग्णलयात उपचार सुरू होते. त्यांची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर ते पुन्हा चित्रीकरणात सहभागी होतील. असा त्यांना विश्वास होता. शेवटच्या श्वासापर्यंत अभिनय करायचा अशी त्यांची इच्छा होती. अत्यंत काबाडकष्ट करून त्यांनी येथपर्यंत वाटचाल केली होती. तारक मेहता या मालिकेतील नट्टू काकाच्या भूमिकेमुळे ते घरोघरी पोहोचले होते. या मालिकेतील जेठालाल अर्थात दिलीप जोशीसह अन्य कलाकारांशी त्यांचे मैत्रीचे संबंध होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajnath Singh: संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचा इशारा: भारतीय नौदल फक्त समुद्राचे नाही तर देशाच्या आर्थिक सुरक्षेचे मुख्य आधार आहे

Nashik News : नाशिकमध्ये ३९१ गणेश मंडळांना पोलिसांची परवानगी; महापालिकेकडून ४५५ मंडळांना ग्रीन सिग्नल

Saurabh Bhardwaj: भारद्वाज यांच्या निवासस्थानी छापे; बांधकाम गैरव्यवहारप्रकरणी ईडीची कारवाई, ‘आप’कडून टीकास्त्र

Nashik Ganeshotsav 2025 : नाशिकमध्ये गणरायाच्या आगमनाचा उत्साह शिगेला, बाजारपेठा गजबजल्या

R Ashwin Retirement: IPL निवृत्तीनंतर काय करणार अश्विन? परदेशात खेळायचे असेल, तर BCCI चा नियम काय?

SCROLL FOR NEXT