Chahatt Khanna Esakal
मनोरंजन

Chahatt Khanna: 'मला तिहार तुरुंगात लग्नासाठी प्रपोज' ... चाहत खन्नांने केले सुकेशबद्दल धक्कादायक खुलासे

नुकतेच चाहत खन्नाने सांगितले आहे की सुकेशने तिला तिहार तुरुंगात लग्नासाठी कसे प्रपोज केले आणि मुलांची काळजी घेण्यास सांगितले.

सकाळ डिजिटल टीम

महाठग सुकेश चंद्रशेखरशी संबंधित २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात आजवर अनेक खुलासे झाले. यात जॅकलिन फर्नांडिस, नोरा फतेही एवढेच नाही तर टीव्ही अभिनेत्री चाहत खन्ना निक्की तांबोळी, सोफिया सिंग आणि आरुषा पाटील यांच्या नावाचाही यात समावेश आहे. त्यापैकी काही अभिनेत्रींनी त्यांची तुरुंगात भेटही घेतली होती. आता त्यात पुन्हा चाहत खन्ना हे नाव चर्चेत आले आहे. तिने सुकेश बद्दल अनेक खुलासे केले.

चाहत खन्ना यांनी हिनं मुलाखतीदरम्यान सांगितले की, मे 2018 मध्ये तिला दिल्लीतील एका शाळेच्या कार्यक्रमात जज म्हणून उपस्थित राहण्यासाठी फोन आला. त्यासाठी ती 18 मे 2018 रोजी दिल्लीला पोहोचली. दिल्लीला पोहोचताच तिची भेट एंजल खान नावाच्या महिलेशी झाली. जी तिला शाळेच्या कार्यक्रमांना तिच्यासोबत घेऊन जाऊ लागली. मात्र तिने गाडी शाळेच्या दिशेने न नेता दुसरीकडेच नेत असल्याच तिच्या लक्षात आलं.

पुढे ती म्हणाली की, तो राखाडी रंगाच्या इनोव्हामध्ये बसली आणि काही सेकंदातच तिला समजले की ती तिहार जेलच्या बाहेर आहे. याबाबत एंजलला विचारणा केली असता, कारागृहाच्या आवारातून शाळेत प्रवेश करावा लागेल, असे त्याने सांगितले. तुरुंगात सुकेशशी ती अभिनेत्रींची ओळख करून देते. चाहत पुढे म्हणाली की, जेव्हा तिला समजले की ती तिहारमध्ये आहे तेव्हा तिने त्यांना कार थांबवण्यास सांगितले. पण एंजलने तिला गप्प केले.

हेही वाचा- ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

चाहत सांगते की, मला माहित होतं की मी अडकली आहे आणि माझ्या दोन मुलांचा विचार करून मी घाबरली . गाडीतून खाली उतरताच मला एका खोलीत नेण्यात आले. मला आठवते की ती खोली लॅपटॉप, घड्याळे आणि महागड्या लक्झरी वस्तूंनी भरलेली होती. एवढेच नाही तर जगभरातून ब्रँडेड बॅगही तिथे होत्या. त्या खोलीत एक सोफा होता, एक पोर्टेबल एसी, एक खुर्ची, फ्रीज..सगळं सामान त्या छोट्या खोलीत भरलेलं होतं.

अभिनेत्रीने पुढे सांगितले की त्या खोलीत एक माणूस आला ज्याने त्याचे नाव शेखर रेड्डी असे सांगितले. त्याने अभिनेत्रीला सांगितले की तो तिचा मोठा चाहता आहे. ज्यावर अभिनेत्री म्हणाली की तिने त्याला का बोलावले आहे. त्यानंतर स्वत:ला शेखर रेड्डी म्हणवणाऱ्या व्यक्तीने तिला गुडघ्यावर बसवून लग्नाचा प्रस्ताव दिला.

यानंतर अभिनेत्रीने त्याच्यावर ओरडून सांगितले की, ती आधीच विवाहित आहे आणि तिला दोन मुले आहेत. त्यावर तो म्हणाला की माझा नवरा माझ्यासाठी योग्य माणूस नाही आणि तो माझ्या मुलांचा बाप होईल, असे तिने सांगितले. मला इतकी भीती वाटली की मी रडायला लागली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gutkha Ban: आता गुटखा विक्रेत्यांची खैर नाही! फक्त बंदी नाही, थेट मकोका...; महाराष्ट्र सरकारचा मोठा धडाका

Who is Rajan Patil : अजित पवारांचा डाव उधळणारा पठ्ठ्या! अनगरच्या रणांगणातून राजकीय ठिणगी पेटवणारे राजन पाटील कोण?

Viral Video: मलायका अरोराचा हटके स्टंट! स्पर्धकाच्या डोक्यावर ठेवला गॅस, अन् बनवला चहा, व्हिडिओ चर्चेत

Rahul Gandhi: ''राहुल गांधी निवडणूक आयोगाला बदनाम करत आहेत'', देशातल्या 272 दिग्गजांनी लिहिलं खुलं पत्र

Maharashtra CET Exam: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! आता CET परीक्षा वर्षातून तीनदा होणार, वाचा नवीन नियम

SCROLL FOR NEXT