tv actress yashashri masurkar ditched her car auto rickshaw 
मनोरंजन

'या' अभिनेत्रीने कार विकून घेतली रिक्षा; कारण वाचून व्हाल थक्क !

वृत्तसंस्था

मुंबई : एका अभिनेत्रीने काही महिन्यांपूर्वी आपली आलिशान कार विकून चक्क रिक्षा घेतली आणि आता ती हा रिक्षा स्वतः चालवत सेटवर जाते. यशश्री मसुरकर असे या अभिनेत्रीचे नाव आहे. रंग बदलती ओढणी, चंद्रगुप्त मौर्य अशा अनेक मालिकांमध्ये तिने काम केले आहे.

गाडी विकून तिने रिक्षा घेण्यामागचे कारण सांगताना एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, रिक्षा घेतल्यापासून माझे पैसे आणि वेळ या दोन्ही गोष्टी वाचतात. माझ्याकडे कार होती. पण मला कार चालवता येत नव्हती. म्हणून मला ड्रायव्हरवर विसंबून राहावे लागत असे. त्यामुळे मी कार विकून रिक्षा घेतली आणि रिक्षा चालवत मीच सगळीकडे जायला लागले असे यशश्रीने सांगितले.

IndvsNZ : दुसरा सामना जिंकत के एल राहुलचे अनोखे दोन विक्रम

यशश्री म्हणाली, 'सुरुवातीला मी रिक्षा चालवत असताना लोक माझ्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहायचे. पण, आता मला याची सवय झाली आहे. ही कल्पना यशश्रीला तिच्या मित्रामुळे असल्याचेही तिने सांगितले आहे. तिचा मित्र डेन्मार्कवरून थेट मुंबईला सायकलवरून आला होता. डेन्मार्क ते मुंबई प्रवासासाठी त्याला 1 वर्ष 6 महीने इतका कालावधी लागला होता. त्याची कहाणी तिला प्रेरणादायी वाटली, म्हणून तिने रिक्षाने मुंबई ते आग्रा असा प्रवास केला असल्याचेही सांगितले.

मुख्यमंत्री ध्वजारोहण करणार तिथेच काँग्रेस नेत्यांची हाणामारी

यशश्री सध्या रेडीओ जॉकी म्हणून काम करत आहे. रेडीयो जॉकी म्हणून काम करण्यातही एक वेगळीच मजा येत असल्याचे तिने म्हटले आहे. एवढेच नव्हे तर यशश्री अनेकवेळा गरजू मुलांना तिच्या रिक्षामधून लिफ्ट देखील देते. तिने सुरुवातीला रिक्षा चालवायला सुरुवात केली, त्यावेळी तिच्याच मित्रमैत्रिणींनी तिची टर उडवली होती. पण आता सगळ्यांनाच तिला या रूपात पाहायची सवय झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा संताप, तिकिटांच्या किमती पाहून चक्रावले; मागील पर्वात ११०० ला मिळणारं तिकिट आता...

हर हर महादेव! 'राजा शिवाजी'चा टीझर प्रदर्शित, जिनिलिया साकारतेय 'ही' महत्वाची भूमिका, रितेशला पाहून सगळेच झाले थक्क

Horoscope : गुढी पाडव्यानानंतर 'या' 3 राशींना धनलाभ सुरू; दर महिन्याला मिळेल नवी खुशखबर, साडे तीन मुहूर्त काळात नशिबाचे चक्र फिरणार

Latest Marathi News Live Update : PNG कनेक्शन लगेच मिळणार, केंद्र सरकारचे राज्यांच्या यंत्रणांना आदेश

इंडियन प्रीमिअर लीग अनधिकृत? BCCI विरोधात केरळ उच्च न्यायालयात विचित्र याचिका दाखल; २८ पासून लीग सुरू होणार की नाही?

SCROLL FOR NEXT