Bigg Boss 17 Contestants Esakal
मनोरंजन

Bigg Boss 17 Contestants: 'बिग बॉस 17' च्या घरात कोण होणार लॉक! स्पर्धकांची पहिली झलक आली समोर, व्हिडिओ व्हायरल

Vaishali Patil

Bigg Boss 17 Contestants: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस 17' गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नुकताच या शोच्या प्रीमियर एपिसोडचा प्रोमो रिलीज झाला आहे, ज्यामध्ये सलमान खान बिग बॉसच्या घरात दिसला.

आता या स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक आहे. त्यामुळे आता घरात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचे व्हिडिओ देखील समोर येऊ लागले आहेत.

सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉस 17 ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या शोच्या लॉन्च अगोदर, कलर्स टीव्हीने आता स्पर्धकांचे प्रोमो जारी केले आहेत.

यात फक्त स्पर्धकांची झलक दिसली आहे. त्यांची नावे अजून समोर आलेली नसली तरी ती स्पर्धक कोण आहेत याची चाहत्यांना हिंट देण्यात आली आहे. आता या सीझनमध्ये कोणते सेलेब्स जाणार आहेत हे हळूहळू समोर येत आहे.

बिग बॉस 17 च्या अनेक नवीन कन्फर्म केलेल्या स्पर्धकांची नावे समोर आली आहेत. निर्मात्यांनी नवीन प्रोमो रिलीज केले आहेत. यातच अंकिता लोखंडे तिचा पती विकी जैन यांची जोडी बिग बॉस 17 मध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज झाली आहे. या जोडप्याचा हा डान्स व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये अंकिता आणि तिचा पती विकी डान्स करताना दिसत आहे.

तर एका स्पर्धकाचा व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे ज्यात ज्यामध्ये अभिनेत्री 'बिग बॉस 17' च्या सेटवर 'हे मेरी परम सुंदरी' गाण्यावर डान्स करताना दिसली. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन लिहिले होते, 'कोण आहे हे सौंदर्य, कोण या सीझनमध्ये खळबळ माजवेल?' ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून ईशा मालवीय डान्स असल्याचं नेटकरी बोलत आहेत.

ईशा मालवीयानंतर आता आणखी एका स्पर्धकाचा व्हिडिओ शेयर करण्यात आला आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची बहीण मन्नारा चोप्राचा हा व्हिडिओ आहे. ती साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. बिग बॉस ओटीटीमध्ये आलिया भट्टची बहिण पुजा दिसली होती तर या सिझनमध्ये तिची जागा प्रियंकाच्या बहिणीने घेतील आहे.

तर त्यापुढचा व्हिडिओ 'उदारियां' फेम अभिनेता अभिषेक कुमारचा आहे. त्याचा प्रोमो रिलीज करताना निर्मात्यांनी लिहिले की, 'आपल्या स्टाईलने सर्वांना मोहित करा, कोणीतरी येत आहे, 9 वाजताचा अलार्म सेट करा'

बिग बॉस 17चा सिझन सुरु होण्यासाठी अवघे काही तास बाकी आहेत. हा शो 15 ऑक्टोबर 2023 रोजी छोट्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज आहे. यंदाचा सीझन हा वेगळा असणार अशी चर्चा आहे. आता निर्मात्यांनी स्पर्धकांचे व्हिडिओ शेयर करत प्रेक्षकांची उत्सुकता आणखीच वाढवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT