rakhi sawant  esakal
मनोरंजन

Video Viral: 'थांबा मीच विमान उडवते', प्रवाशांचा जीव टांगणीला

टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध सेलिब्रेटी राखी सावंत ही (Rakhi Sawant) नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखली जाते.

सकाळ ऑनलाइन टीम

Tv Entertainment: टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध सेलिब्रेटी राखी सावंत ही (Rakhi Sawant) नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखली जाते. तिनं यापूर्वी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आहे. काही दिवसांपूर्वी तिनं बॉलीवूडची क्वीन कंगना रनौतच्या लॉक अप (Bollywood Actress Kangana Ranaut) या शो वरुन कंगनाचे कान टोचले होते. कंगनानं बॉलीवूडचा भाईजान सलमानवर टीका केली होती. त्यावर राखीनं कंगनानं हा शो किमान शंभर दिवस तरी चालवून दाखवावा असं विधान केलं होतं. आता राखीनं इंस्टावर एक पोस्ट शेयर केली आहे. (Rakhi Sawant Latest Video) त्यामध्ये तिनं प्रवाशांना असं काही सांगितलं की त्यामुळे त्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागला आहे.

राखीनं जो व्हिड़िओ शेयर केला आहे त्यामध्ये ती एका विमानातून प्रवास करते आहे. त्यात तिनं प्रवाशांना ते विमान उडवणार असल्याचे सांगितले. ड्रामा क्वीन म्हणून राखीकड़े पाहिले जाते. तिची बॉलीवूडमध्ये स्टंटबाज अभिनेत्री म्हणून ओळख आहे. कायम वेगवेगळ्या प्रकारचे वाद तयार करुन लाईमलाईटमध्ये कसे राहायचे हे राखीला साधले आहे. बिग बॉसच्या गेल्या सत्रामध्ये राखीनं आपल्या लोकप्रियतेनं प्रेक्षकांना दखल घेण्यास भाग पाडले आहे. अशावेळी बिग बॉसची एंटरटेनर म्हणून राखीचे नाव प्रेक्षकांच्या तोंडी होते. आता मात्र राखीनं कहर केला आहे. त्यात तिनं प्रवाशांना विमानाची पायलट होणार असल्याचे सांगितले. तेव्हा मात्र प्रवाशांना मोठी काळजी वाटली होती.

राखीच्या त्या व्हिडिओला तिच्या चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्याला नेहमीप्रमाणे नेटकऱ्यांनी ट्रोलही केले आहे. राखी दरवेळी लक्ष वेधून घेण्यासाठी काहीही करत असते. अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी राखीला दिल्या आहेत. ती त्या व्हिडिओमध्ये म्हणते, मी आज विमान चालवण्याचा विचार करते आहे. तुम्हाला काय वाटतं मी असं करावं का, तुम्हाला जर फार उकडत असेल तर तुम्ही खिडकी उघडू शकता. राखीच्या या गोष्टी ऐकल्यावर प्रवाशांना मोठा धक्काच बसला आहे. तिच्या या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

2030 Commonwealth Games : २०३०च्या 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा'बाबत मोठी अपडेट!, यजमान शहर म्हणून अहमदाबादची शिफारस

Pat Cummins ने सांगितली भारत-ऑस्ट्रेलियाची सर्वोत्तम ODI XI; रोहित-विराटला स्थानच नाही, 'या' तीन माजी भारतीयांना निवडलं

Pakistan Afghanistan: काबूलवर पाकिस्तानचा बॉम्बवर्षाव, अफगाणिस्तानकडून ड्रोन हल्ला; 48 तासांची शस्त्रसंधी

T20 World Cup 2026: नेपाळ-ओमान वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात येणार! १९ संघ ठरले, आता उरली एक जागा

Latest Marathi News Live Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT