Cid Actor Robbed news  esakal
मनोरंजन

CID मधल्या ऋषीकेशची बॅग चोरीला, महत्वाची कागदपत्रे झाली गहाळ

टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध मालिका सीआयडीची (CID) लोकप्रियता मोठी आहे.

युगंधर ताजणे

Tv Entertainment: टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध मालिका सीआयडीची (CID) लोकप्रियता मोठी आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्यामुळे या मालिकेतील वेगवेगळी पात्र, मुख्य (Entertainment News) तपासअधिकारी, डॉक्टर, तपासयंत्रणा यांच्याशी प्रेक्षक परिचित आहे. आता या मालिकेत काम करणाऱ्या एका अभिनेत्याविषयी महत्वाची बातमी व्हायरल झाली आहे. त्या अभिनेत्याची बॅगच एका बसमधून चोरीला गेली आहे. त्यामध्ये रोख रक्कम होती. तसेच काही महत्वाची कागदपत्रंही गहाळ (Social media viral news) झालेली आहेत. असं त्या अभिनेत्यानं तक्रार देताना सांगितलं आहे.

सीआयडी मालिकेतून ते अधिकारी मोठमोठ्या गुंतागुंतीच्या केसेस सोडवताना (Tv Entertainment Actor) दिसतात. आरोपीला शोधून काढत त्याला गजाआड पाठवतात. पण जेव्हा एखाद्या सीआयडी अधिकाऱ्याच्या बॅगचीच चोरी होते तेव्हा मात्र ती गोष्ट प्रेक्षकांना, चाहत्यांना खटकल्याशिवाय राहत नाही. अशीच घटना सीआयडी मालिकेतील ऋषीकेश पांडेच्या बाबत घडली आहे. सीआयडी मालिकेत पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका करणारा अभिनेता म्हणून ऋषीकेशची ओळख आहे. त्यानं आपल्या अभिनयानं वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यानं जेव्हा ही घटना घडली तेव्हा एका पोलीस इन्स्पेक्टरसोबत अशा प्रकारची घटना घडली हेच नवल असल्याचे म्हटले आहे.

त्याचं झालं असं की, ऋषीकेश हा त्याच्या कुटूंबासमवेत एलिफंटा केव्ह्ज पाहण्यासाठी गेला होता. यावेळी कुलाबा ते ताडदेव अशा मार्गानं धावणाऱ्या एका बसमध्ये प्रवास करत होता. ती एक वातानुकूलित बस होती. सायंकाळी साडेसहाची वेळ असेल. स्टॉप आल्यावर जेव्हा मी माझी बॅग घ्यायला गेलो तेव्हा मात्र ती नव्हती. त्या बॅगेत पैसे होते. क्रेडिट, डेबिट कार्ड होते. याशिवाय माझी काही महत्वाची कागदपत्रेही होती. असं ऋषीकेशनं सांगितलं. चोरीची घटना घडली असे लक्षात आल्यावर मी थेट कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

माझ्याबाबत किती मोठा विरोधाभास घडला आहे. तो म्हणजे मी ज्या मालिकेत पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारतो त्या मालिकेच्या कलाकाराला चोरीच्या घटनेला सामोरं जावं लागलं आहे. मी काहीच करु शकत नाही. बसनं प्रवास करणं मला महागात पडलं आहे. मला आशा आहे की, पोलीस माझ्या केसबाबत मदत करतील. असं ऋषीकेशनं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना, काही जण अडकल्याची भीती; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Nagpur Leopard Rescue : इंजेक्शन मारलं अन् जाळीत पकडलं; भरवस्तीत शिरलेला बिबट्या जेरबंद, रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक घटनाक्रम

Kitchen Hacks: हिवाळ्यात सहज सेट होईल मलाईदार दही; जाणून घ्या एकदम सोपा घरेलू उपाय

Stree Mukti Parishad : स्वातंत्र्याचा वारसा सांभाळणे काळाची गरज; धार्मिक बंधनेच महिलांवरील अत्याचारांचे मूळ: लीलाताई चितळे

फक्त दीड लाख लोकसंख्या असलेला देश फीफा वर्ल्डकपसाठी पात्र; प्रशिक्षकाच्या अनुपस्थितीत घडवला इतिहास

SCROLL FOR NEXT