Did Lil winner Nobojit  esakal
मनोरंजन

DID Lil Masters 5 Winner: 9 वर्षांचा नोबोजित नारझरी विजेता

टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध शो डान्स इंडिया डान्स या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला.

युगंधर ताजणे

DID Lil Season 5: टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध शो डान्स इंडिया डान्स या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. यंदाच्या (entertainment news) पाचव्या सीझनमध्ये आसामच्या नोबिजित नारजारीनं (Nobojit Narzary) विजेतेपद पटकावलं आहे. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यानं त्या विजेत्यापदावर आपलं नाव कोरलं आहे. असा कामगिरी करणारा तो पहिला स्पर्धक ठरला आहे. महाअंतिम सोहळ्याच्या प्रसंगी जुग जुग जियोची पूर्ण टीम हजर होती. त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या (bollywood celebrity attendence) सोहळ्याला चाहत्यांकडूनही मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये लोकप्रिय असणारा शो म्हणून डान्स इंडिया डान्सचा बोलबाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून नोबोजितनं या स्पर्धेत विजेतेपद मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत केली होती. त्याच्या सादरीकरणानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. नोबोजित हा फ्री स्टाईल, हिप हॉप याच्याबरोबर त्यानं वेगवेगळ्या डान्स प्रकारातून आपली गुणवत्ता सिद्ध केली होती. त्यामुळे त्याच्या सादरीकरणाला नेहमीच प्रेक्षकांची उस्फुर्त दाद मिळाल्याचे दिसून आले.

डीआयडी लिटिल मास्टर्सच्या त्या शो च्या यापूर्वीच्या सीझनला देखील नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. शिल्पा शेट्टी ही या शो मधील प्रमुख परीक्षक होती. अनुराग बसु यांच्या परीक्षकपदाची वेगळीच चर्चा शो दरम्यान होती. नेहमीप्रमाणे या सीझनच्यावेळी हजारो स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. अंतिम सोहळ्यासाठी 15 स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. तीन महिन्यांच्या कालावधीनंतर त्यांचा अंतिम फेरी पार पडली. 26 जुनला झालेल्या ग्रँड प्रिमिअरमध्ये सागर, नोबोजित, अप्पन, अध्याश्री आणि इशिता सहभागी झाल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasant More Video: शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी..,दुबेंना मोरेंनी खडसावलं..

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

SCROLL FOR NEXT